दमदार पावसामुळे जामखेडी धरण ओव्हरफ्लो ; पिंपळनेरचे लाटीपाडा धरण निम्मेच

जामखेडी धरण ओव्हरफ्लो

पिंपळनेर : (ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा

पिंपळनेरच्या आदिवासी पश्चिम पट्ट्यात संततधार पावसाने हजेरी लावल्याने जामखेली नदीच्या प्रवाहात आज पहाटे वाढ झाली असून जामखेली धरण भरून सांडव्यावरून पाणी ओसंडून वाहत आहे. गेल्या काही दिवसांपासून पिंपळनेरसह परिसरातील लगतच्या अनेक भागात चांगला पाऊस झाल्याने शेती कामांना वेग आला असून जामखेडी प्रकल्पासह इतर प्रकल्पाच्या पाणीपातळीत रात्रीतून कमालीची वाढ झाल्याने जामखेली प्रकल्प १०० टक्के भरुन ओसंडून वाहत आहे.

गेल्या वर्षी आदिवासी पश्चिम पट्ट्यात मुसळधार पाऊस पडल्याने जून महिन्यातच पिंपळनेरचे लाटीपाडा धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. मात्र यंदा जुलै महिना अर्धा झाला तरी पांझरा प्रकल्पात केवळ ४४ टक्के पाणी साचले आहे. आता धरण पूर्ण क्षमतेने किती दिवसानंतर भरेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकल्पामुळे पिंपळनेर परिसरातील ५० टक्के यांपेक्षा जास्त क्षेत्र पाण्याखाली आले आहे. पिंपळनेरसह पश्चिम पट्ट्यात दरवर्षी चांगला पाऊस झाल्यास लाटीपाडा धरण पूर्ण क्षमतेने भरुन जाते. तसेच या धरणामुळे परिसरातील शेतीला पाणी उपलब्ध होत असून भूजल पातळी वाढण्यास मदत होते. पांझरा प्रकल्पातून डावा कालवा आणि उजवा कालवा अशा दोन कालव्याने सर्वत्र पुरवठा होतो. उजवा कालवा हा २२.८० किमीचा आहे तर डावा ६.८० किमीचा आहे. यातून पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सांडव्याची लांबी २९० मीटर आहे. अनेक वर्षांपासून धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. तो संबंधित विभागाने काढणे आवश्यक आहे. लाटीपाडा धरणात सद्य:स्थितीत केवळ ४४ टक्के इतका जलसाठा उपलब्ध आहे.

पिंपळनेर व परिसरातील प्रकल्पात उपलब्ध जलसाठा

पांझरा मध्यम प्रकल्प- पाणी साठा १५.७४ दलघमी %
जामखेडी प्रकल्प पाणी साठा १९.७४ दलघमी %
शेलबारी लघु प्रकल्प पाणी साठा ०.०३ दलघमी,२४% .
विरखेल तघु तलाव पाणी साठा ०.१४ दलघमी%

मंडळनिहाय झालेला पाऊस
यंदाच्या हंगामात पिंपळनेर मंडळात ७८.९ मिमी.कुडाशी मंडळात १४६.० मिमी, उमरपाटा मंडळात ११२.९ मिमी,साक्री मंडळात ८९.६ मिमी,कासारे मंडळात ४७. ३ मिमी,म्हसदी मंडळात ७१.९ मिमी,दुसाने मंडळात १ ३४.४ मिमी,निजामपूर मंडळात ९८.८ मिमी,ब्राम्हणवेत मंडळात ९८.८ मिमी,दहिवेल मंडळात ९९ मिमी एवढा पाऊस झाला आहे.

हेही वाचा : 

The post दमदार पावसामुळे जामखेडी धरण ओव्हरफ्लो ; पिंपळनेरचे लाटीपाडा धरण निम्मेच appeared first on पुढारी.