धुळे : आमदार फारुख शाह यांच्या प्रश्नांचे निराकरण करणार; गृहमंत्री यांचे सभागृहात विवेचन

धुळे : पुढारी वृत्तसेवा

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आमदार फारुक शहा यांनी पोलीस प्रशासनाच्या विरोधात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सुरू केलेल्या उपोषणाबाबत सभागृहात मुद्दा उपस्थित केला. त्यानुसार या प्रकरणाऐवजी स्तरावरील अधिकाऱ्यांच्या माध्यमातून चौकशी करण्याचे आश्वासन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिले, त्यानंतर शाह यांनी आंदोलन मागे घेतले आहे.

धुळे शहरांमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न बिकट झाला असून पोलीस प्रशासनाचा कुठलाही वचक दिसून येत नाही. म्हणून आमदार फारुक शहर हे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर उपोषणाला बसलेले आहेत. त्यांच्या प्रश्नांचे निराकरण तातडीने करण्यात यावे. सरकारच्यावतीने जबाबदार प्रतिनिधी पाठवून आ.फारुख शाह यांचे उपोषण सोडण्यास विनंती करावी. विरोधी पक्ष नेत्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावरून महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात निवेदन केले. आमदार फारुक यांनी उपस्थित केलेल्या प्रश्न बाबत आयोजित दर्जाचा अधिकारी नेमून सखोल चौकशी करण्यात येऊन जबाबदार लोकांवर सक्त कारवाई करण्यात येईल असे आश्वास्त केले. त्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, ना.शंभूराज देसाई यांनी आमदार फारुख शाह यांची उपोषणस्थळी भेट घेवून त्यांनी सुरू केलेले उपोषण मागे घ्यावे. प्रश्नासंदर्भात सभागृहात चर्चा झाली असून आय.जी.दर्जाचा अधिकारी याबाबतची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करेल. त्यामुळे उपोषण मागे घ्यावे अशी विनंती केली. यानंतर आ.फारुख शाह यांनी उपोषण मागे घेतले. उपोषणास विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ,आ. रईस शेख,आमदार बच्चू कडू आमदार प्राजक्त तनपुरे,आ.विश्वजित कदम,आ.निलेश लंके,माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी भेट दिली.

हेही वाचा:

The post धुळे : आमदार फारुख शाह यांच्या प्रश्नांचे निराकरण करणार; गृहमंत्री यांचे सभागृहात विवेचन appeared first on पुढारी.