धुळे: आरोग्य विभागात दीड कोटीची वाहने दाखल

dhule

धुळे; पुढारी वृत्तसेवा : धुळे महापालिकेच्या (Dhule Municipal Corporation) आरोग्य विभागात नव्याने एक कोटी तीस लाख रुपये किमतीचे वेगवेगळ्या वाहनांचा ताफा दाखल झाला आहे. पांजरा नदी स्वच्छता अभियानाच्या प्रसंगी निमित्त साधून या वाहनाचे लोकार्पण करण्यात आले. या वाहनांच्या माध्यमातून नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्याचे काम केले जाणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली.

धुळे महापालिकेने (Dhule Municipal Corporation) आरोग्य विभागासाठी नवीन वाहनांची खरेदी केली आहे. यात सुमारे 77 लाख रुपये किमतीचे दोन टिप्पर, 18 लाख रुपये किमतीचे एक पाण्याचा टॅंकर, तीस लाख रुपये किमतीचे पाच फिरते शौचालयांची युनिट तसेच मलेरिया फवारणीसाठी सहा लाख रुपये किमतीचे दोन फॉगिंग मशीन खरेदी करण्यात आली आहेत. स्वच्छ अभियान अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प अंतर्गत शासनाच्या आदेशाने ही नवीन वाहने दाखल झाली आहेत. त्यामुळे घनकचरा वाहतूक सुलभ होणार आहे. ही वाहने घनकचरा प्रक्रिया व व्यवस्थापन प्रकल्पाच्या मंजूर प्रस्तावानुसार सदर वाहने शासनाच्या पोर्टलवरील स्पेसिफिकेशन प्रमाणे खरेदी करण्यात आली आहेत.

यात 60 टक्के शासनामार्फत अनुदान असून उर्वरित 40 टक्के मनपाचा हिस्सा आहे. या वाहनांच्या उपलब्धतेमुळे आरोग्य विभागाची सेवा अधिक बळकट आणि सक्षम होण्यास मदत होणार आहे. त्याचप्रमाणे नागरिकांचे आरोग्य राखण्यासाठी देखील या वाहनांचा उपयोग होऊ शकतो, अशी प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आली. या वाहनांचा ताफा पांजरा नदी स्वच्छता मोहिमेच्या प्रसंगी आरोग्य विभागाच्या ताब्यात दाखल करण्यात आला.

महापौर प्रतिभाताई चौधरी, आयुक्त देविदास टेकाळे यांच्या हस्ते वाहनांचे पूजन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त विजय सनेर, उपायुक्त डॉक्टर संगीता नांदुरकर, अभियंता कैलास शिंदे, नगरसेवक राजेश पवार, सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव चौधरी, बबन चौधरी, प्रभादेवी परदेशी, सहाय्यक अभियंता चंद्रकांत उगले, आरोग्य अधिकारी डॉ. एम. आर. शेख, भंडारपाल राजेंद्र माइनकर, मुख्य स्वच्छता निरीक्षक चंद्रकांत जाधव, लक्ष्मण पाटील, राजेश वसावे, मलेरिया पर्यवेक्षक विकास साळवे आदी उपस्थित होते.

हेही वाचा 

धुळे : ध्येय निश्चित ठेवून यश संपादन करा ; पोलिस उपअधीक्षक साजन सोनवणे

धुळे : पिंपळनेरच्या पश्चिम पट्ट्यात भातलागवड सुरु ; चिखलणी करून भातरोपणी

धुळे : बल्हाणे शिवारातील दोन हातभट्ट्या उद्धवस्त, पिंपळनेर पोलिसांची कारवाई

The post धुळे: आरोग्य विभागात दीड कोटीची वाहने दाखल appeared first on पुढारी.