धुळे : पिंपळनेरच्या संशोधकांनी ह्रदयासंबधी बनवलेल्या यंत्राच्या डिजाईनला पेटंट

पिंपळनेरच्या संशोधकांना पेटंट,www.pudhari.news

धुळे, पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवा

येथील डॉ. प्रशांत कांतिलाल बागुल, डॉ. धनंजय पाटील व नाशिक येथील डॉ. प्रकाश वाणखेडकर व संशोधक टीम यांच्या संशोधनात अजून एक भर पडत नुकतेच भारत सरकार द्वारा त्याच्या ह्रदयस्पंदनाने उत्पन्न होणार्‍या विद्युल्लहरींची नोंद ठेवणाऱ्या यंत्राच्या डिझाईनला भारतीय पेटंट मिळाले आहे.

या यंत्राच्या मदतीने ह्रदयस्पंदनाने उत्पन्न होणार्‍या विद्युल्लहरींची नोंद ठेऊन येणाऱ्या हृदयविकारापूर्वीच रुग्णाला धोक्याची सूचना मिळणार आहे. जनेकरून वेळेवर योग्य तो उपचार करून येणारा हृदयविकाराचा धोका टळू शकतो. या डिझाईनच्या मदतीने लवकरच हे तंत्र विकसित करून जनतेच्या सुरक्षेसाठी उपलब्ध होणार आहे.

डिसेंबर 2022 मध्ये देखील डॉ. प्रशांत बागुल व सहकारी संशोधक टीम यांना इन्सुलिन इंजेक्टींग डिव्हाईस साठी ऑस्ट्रेलियन सरकारचे पेटंट मिळाले आहे. अजून येणाऱ्या दिवसात देखील यांचे काही तंत्र येणार आहेत त्यावर आता अभ्यास व शोध सुरू आहे. येणारे काही तंत्र मेडिकल क्षेत्रात नावीन्यपूर्ण ठरणार आहेत. यांच्या या डिझायनिंग पेटंट मुळे टीम चे सर्वत्र कौतुक होत आहे.

हेही वाचा :

The post धुळे : पिंपळनेरच्या संशोधकांनी ह्रदयासंबधी बनवलेल्या यंत्राच्या डिजाईनला पेटंट appeared first on पुढारी.