धुळे : भाविकांसाठी दीड टन केळी पंढरपूरला रवाना

केळी वाटप,www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा

आषाढी एकादशीनिमित्ताने पंढरपूर येथे गेलेल्या भाविकांना धुळे तालुक्यातील उडाणे येथील ह.भ.प.धर्मराज बागुल, सामाजिक कार्यकर्ते यांच्यावतीने केळीचे वाटप करण्यात येणार आहे. पंढरपूर येथे भाविकांना केळी वाटपाचे हे दुसरे वर्ष आहे. त्यासाठी आज सुमारे दिड टन केळी वाहनाने पंढरपूरकडे रवाना झाली आहे. त्या पाश्‍वभूमीवर माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या हस्ते दिड टन केळीने भरलेल्या वाहनाची पुजा करण्यात आली.

आषाढी एकादशीनिमित्ताने अखंड महाराष्ट्राचे दैवत पंढरपूर येथील विठ्ठल रुख्मीणीचे दर्शन आणि पायी दिंडी ही महाराष्ट्रातील जनतेसाठी धार्मिक पर्वणीच असते. त्या अनुषंगाने पंढरपुर येथे आषाढी एकादशीला लाखो भाविक दाखल होत असतात. दिंडी मार्गावर तसेच पंढरपुर येथे महाराष्ट्रातील असंख्य दानशुर व्यक्ती विविध प्रकारचे दान करीत असतात. अन्नदान, महाप्रसाद, फराळाचे वाटप, आरोग्य सेवा असे विविध उपक्रम राबविले जातात. त्या पार्श्‍वभूमीवर उडाणे येथील सामाजिक कार्यकर्ते ह.भ.प.धर्मराज बागुल यांच्यावतीने आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपूर येथे भाविकांसाठी फराळ म्हणून दिड टन केळीचे वाटप करण्यात येणार आहे.

त्याअनुषंगाने आज (दि.28) जुन रोजी दिड टन केळीने भरलेले वाहन पंढरपूरकडे रवाना झाले. त्यानिमित्ताने माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या हस्ते सदर वाहनाची पुजा करण्यात आली. यावेळी माजी मंत्री पाटील यांनी भाविकांना शुभेच्छाही दिल्या. याप्रसंगी  विशेष कार्य अधिकारी प्रकाश पाटील, ह.भ.प.धर्मराज बागुल, तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष हरिष पाटील, स्विय सहाय्यक सुनिल देशमुख, सतिष जोशी, रामकृष्ण पाटील, चुडामण पाटील, प्रणव पाटील, ज्येष्ठ नेते पोपट शिंदे, सोमनाथ बागुल, गोताणे माजी सरपचं भगवान पाटील, झुलाल पाटील, चिंचवार माजी सरपंच सोमनाथ पाटील, गोताणे सरपंच भूषण पाटील, राजू मोर, दिगंबर परदेशी, संजय बागुल आदी उपस्थित होते.

हेही वाचा : 

The post धुळे : भाविकांसाठी दीड टन केळी पंढरपूरला रवाना appeared first on पुढारी.