उर्दू पुस्तकांचे फिरते ग्रंथालय आज नाशिक शहरात दाखल

जुने नाशिक www.pudhari.news

जुने नाशिक : पुढारी वृत्तसेवा

केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयातर्फे चालविण्यात येणाऱ्या नॅशनल कौन्सिल फॉर प्रमोशन ऑफ उर्दू लँग्वेज अर्थात एनसीपीयूएलकडून देशभर फिरणारे फिरते ग्रंथालयाचे वाहन बुधवारी (दि. ७) शहरातील सारडा सर्कल येथील नॅशनल उर्दू कॅम्पसमध्ये पोहोचणार आहे. दरम्यान, हे वाहन सकाळी ११ ते सायंकाळी पाच पर्यंत शाळेच्या आवारात राहणार आहे. यावेळी उर्दूप्रेमींनी ग्रंथालयाला भेट देऊन पुस्तके खरेदी करावीत, असे आवाहन वाहनप्रमुख मोहम्मद ताहीर सिद्दीकी यांनी केले आहे.

कौन्सिलचे संचालक डॉ. अकील अहमद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली हे वाहन देशभर भ्रमण करून उर्दूप्रेमींना त्यांच्या पसंतीची पुस्तके सवलतीच्या दरात उपलब्ध करून देत आहेत. तेलंगणा येथून निघालेले हे वाहन कर्नाटक मार्गे महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबई, भिवंडी येथून प्रवास करून नाशकात येणार आहे. यानंतर उद्या व परवा मालेगावात मुक्काम करणार आहे. पुढे धुळे, शहादा, नंदुरबार व अक्कलकुवा या ठिकाणी हे वाहन पोहोचणार आहे. या वाहनामध्ये उर्दू साहित्य, इतिहास, वनौषधी शास्त्र, डिक्शनरी, विज्ञान आदी विषयांवरील शेकडो पुस्तके पाहायला व खरेदी करायला मिळणार आहेत. तसेच खरेदीवर २५ ते ७५ टक्क्यांपर्यंत सूट दिली जाणार आहे. या संधीचा उर्दूप्रेमींनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन नॅशनल कॅम्पसचे सचिव प्रा. जाहिद शेख व उर्दू डिप्लोमाचे केंद्रप्रमुख लियाकत पठाण यांनी केले आहे.

हेही वाचा:

The post उर्दू पुस्तकांचे फिरते ग्रंथालय आज नाशिक शहरात दाखल appeared first on पुढारी.