मी त्याला किंमत देत नाही, रोहित पवारांवर भुजबळ भडकले

छगन भुजबळ, रोहित पवार, www.pudhari.news

नाशिक पुढारी ऑनलाइन डेस्क 

रोहित पवार ला सांगा, मी  1985 ला आमदार झालो, त्यांनतर मुंबईचा महापौर झालो होतो. त्यानंतर चार महिन्यानंतर रोहित पवार यांचा  जन्म झाला. त्यामुळे मला मोठं केलं मला मोठं केलं हे फालतू बोलू नका, जरा इतिहास जाणून घ्या असं छगन भुजबळ यांनी रोहित पवार यांना सुनावलं आहे.

मंत्री छगन भुजबळ नाशिकमध्ये असून त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी, रोहित पवार यांच्यावर त्यांनी चांगलीच तोफ डागली. भुजबळ म्हणाले तुम्ही घरात अजित पवार आणि पवार कुटुंबीयांनी ठरवून साहेबांच्या राजीनाम्याची चर्चा केली. तुमच्या घरात काय चर्चा झाली त्याची आम्हाला कल्पना होती का? असा सवाल करुन मी त्याला किंमत देत नाही अशा शब्दात भुजबळ रोहित पवार यांच्यावर भडकले. तसेच त्यांच्या मतदार संघात जाऊनच मी त्यांना उत्तर देईल असा इशारा छगन भुजबळ यांनी दिला.

अजित पवार गट आता उत्तर सभा घेणार का यासंदर्भात विचारले असता,  उत्तर सभा लवकरच होईल,  17 ला अधिवेशन आहे, काहींचे प्रतिज्ञापत्र घेण्याचे काम सुरू आहे. अजित पवार यांनीच लवकर सभा घेऊ असे सांगितले असल्याचे भुजबळ म्हणाले.

The post मी त्याला किंमत देत नाही, रोहित पवारांवर भुजबळ भडकले appeared first on पुढारी.