धुळे : यमुनाई शैक्षणिक व सांस्कृतिक महिला मंडळास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार

धुळे,www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्र शासनाच्या महिला बालविकास विभागातर्फे दिला जाणारा नाशिक विभागीय स्तरावरील यावर्षीचा प्रतिष्ठेचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार धुळे येथील यमुनाई शैक्षणिक व सांस्कृतिक महिला मंडळास मिळाला आहे.

पुणे येथे महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते व महिला व बालकल्याण विकास विभागाच्या आयुक्त आर. विमला, पुणे विभागीय उपायुक्त दिलीप हिवराळे, बालविकास विभाग उपायुक्त राहुल मोरे व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. संस्थेच्या अध्यक्षा मंगला वाघ, सचिव मनिषा वाघ यांनी हा पुरस्कार स्विकारला.

यमुनाई शैक्षणिक व सांस्कृतिक महिला मंडळाच्या वतीने धुळे येथे श्री संस्कार अनाथ मतिमंद मुलींचे बालगृह व कार्यशाळा चालविण्यात येते. समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक स्व. भालचंद्रदादा वाघ यांच्या मार्गदर्शनाने सुरु झालेल्या या संस्थेत सध्या न्यायालयामार्फत आलेल्या 85 अनाथ निराधार मुली असून या मुलींच बौद्धीक व सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीकोनातून संस्थेच्या अध्यक्षा मंगला वाघ व सचिव मनिषा वाघ यांच्या नेतृत्वाखाली व संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक सुनिल भालचंद्र वाघ, भरत भालचंद्र वाघ, मयुर वाघ, निखिल वाघ अधिक्षका दिपश्री पवार, हिरल वाघ व संस्थेचे शिक्षक -शिक्षिका व कर्मचारी अहोरात्र प्रयत्नशिल असतात.

या प्रयत्नाचेच पुरस्कार हे फलित असून आम्ही जे उभे केले ते श्रेय दानुशरांचे असून समाजाची कौतुकाची थाप असली की आमचा उत्साह वाढतो अशी प्रतिक्रिया वाघ परिवाराने व्यक्त केली. यापूर्वीही संस्थेला अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले असून अहिल्यादेवींच्या नावाचा प्रतिष्ठेच्या पुरस्कार मिळाल्याने सर्व स्तरातून संस्थाचालकांचे अभिनंदन व कौतुक होत आहे.

हेही वाचा : 

The post धुळे : यमुनाई शैक्षणिक व सांस्कृतिक महिला मंडळास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार appeared first on पुढारी.