धुळे : शिरपूर तालुक्यातील विविध विकास कामांसाठी ४७ कोटी ३१ लाख रुपयांचा निधी मंजूर

शिरपूर नगरपरिषद www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा

आ. अमरिशभाई पटेल व आ. काशिराम पावरा यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून शिरपूर तालुक्यातील विविध विकास कामांसाठी ४७ कोटी ३१ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

शिरपूर नगरपरिषद क्षेत्रातील कामांसाठी ५ कोटी रुपयांचा भरघोस निधी मंजूर करण्यात आला आहे. यात शिरपूर शहरात सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पासाठी विज पुरवठा कामी सौरऊर्जा प्रकल्प राबविणे २ कोटी रुपये, शिरपूर शहरात सर्वे नं. २८, २९, ३१ इ. हद्दवाढ क्षेत्रात भुयारी गटारी बनविणे १ कोटी रुपये, शिरपूर शहरात सर्वे नं. १५२, ८, ३६, १५८ इ. हद्दवाढ क्षेत्रात खुल्या जागेला संरक्षक भिंत बांधणे ८० लाख रुपये, शिरपूर शहरात बालाजी नगर जलकुंभ परिसरात पाणी पिण्यासाठी पाईपलाईन करणे ८५ लाख रुपये, शहरात भारजा गॅस जवळ सार्व. शौचालयाचे बांधकाम करणे ३५ लाख रुपये असे एकूण ५ पाच कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तसेच महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत मंजूर प्रकल्प किंमत ५७ कोटी ४२ लाख रुपयांच्या शिरपूर वरवाडे रस्ते विकास प्रकल्पाचा द्वितीय हप्ता १६ कोटी २७ लाख रुपये मंजूर झाला आहे. महाराष्ट्र शासन प्रादेशिक पर्यटन विकास योजना सन २०२२-२३ अंतर्गत पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी प्रादेशिक पर्यटन योजनेंतर्गत दहिवद येथे मानव केंद्रासह सोयी सुविधा उपलब्ध करणे कामी १ कोटी ९९ लाख रुपये, आमोदे येथे सारंगेश्वर महादेव मंदिर येथे संरक्षक भिंत बांधकाम व इतर सोयी सुविधा करणे साठी ३२ लाख रुपये, तसेच आमोदे येथे गजानन महाराज मंदिर सभामंडप बांधकाम व इतर सोयी सुविधा करणे साठी ४९ लाख ९९ हजार रुपये, करवंद येथे गोरक्षनाथ मंदिर येथे सोयी सुविधा करणे साठी ३२ लाख रुपये असे एकूण ३ कोटी १२ लाख ९९ हजार रुपये मंजूर झाले आहेत. प्रधानमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत हिंगणी बु.-वाघाडी- चांदपुरी- अर्थे- बलकुवा रस्ता ८ कोटी २६ लाख ७५ हजार रुपये, रा.मा. ०४ ते गरताड रस्ता ४ कोटी ३९ लाख ९० हजार रुपये, वरझडी -हिंगोणीपाडा रस्ता २ कोटी ४८ लाख ७१ हजार रुपये असा एकूण १५ कोटी १५ लाख ३६ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा-२ आशियाई विकास बँक अर्थसहाय्य अंतर्गत धुळे जिल्ह्यातील रस्त्यांची दर्जोन्नती करण्यासाठी शिरपूर तालुक्यात रामा- ०४ भाटपुरा- होळनांथे -पिंपळे रस्ता ६ कोटी ५१ लाख ५० हजार रुपये, रामा-४ थाळनेर- भोरटेक रस्ता ६ कोटी ५१ लाख ५७ हजार रुपये तसेच रा.म.मा.- ०३ चारणपाडा रस्ता १ कोटी ४७ लाख ८ हजार रुपये, चांदसे- उखळवाडी- भामपूर रस्ता ८ कोटी ४० लाख ९४ हजार रुपये असा एकूण २२ कोटी ९१ लाख ९ हजार रूपयांचा निधी मंजूर झाला. याप्रमाणे शिरपूर तालुक्यातील विविध विकास कामांसाठी ४७ कोटी ३१ लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्यामुळे शिरपूर तालुक्यातील जनतेने आमदार अमरिशभाई पटेल व आमदार काशिराम पावरा यांचे आभार मानले आहेत.

हेही वाचा:

The post धुळे : शिरपूर तालुक्यातील विविध विकास कामांसाठी ४७ कोटी ३१ लाख रुपयांचा निधी मंजूर appeared first on पुढारी.