धुळ्यात राष्ट्रवादीने केला खोके दिवस साजरा

राष्ट्रवादी, www.pudhari.news

धुळे (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा 

राज्यातील एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारच्या विरोधामध्ये आज धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने खोके दिवस व गद्दार दिवस म्हणून साजरा केला. यावेळी महात्मा गांधी पुतळ्याजवळ सरकारच्या विरोधात निदर्शने करीत घोषणाबाजी करण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष रणजीत भोसले यांच्या नेतृत्वामध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महात्मा गांधी पुतळा येथे आंदोलन करुन घोषणा देऊन निषेध केला. आंदोलनाला कुणाल पवार, महेंद्र शिरसाठ, राजू चौधरी, उमेश महाजन, दीपक देवरे, डी.टी.पाटील, दीपक देसले, एजाज शेख, भानुदास लोहार, राजेंद्र सोलंकी, चेतन पाटील, भूषण पाटील, सरोज कदम, संगीता खैरनार, वंदना केदार, किरण सूर्यवंशी, शेख समद, मसूद अन्सारी, फिरोज पठाण, मंगला मोरे, निखिल मोमया, भटू पाटील, जगन ताकटे, संजय नेरकर, मनोज कोळेकर, दानिश पिंजारी, रामेश्वर साबरे आदि कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी राज्यातील भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे सरकार गद्दारी करून आल्याचा आरोप करण्यात आला. त्याचप्रमाणे प्रतिक्रिया व्यक्त करताना राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रणजीत भोसले यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत.

शिंदे गटाने महाराष्ट्राशी केलेल्या गद्दारीला आज 20 जून रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. खोके वीरांच्या वर्षपूर्ती निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस आज गद्दार दिवस व खोके दिवस साजरा करीत असल्याचे भोसले यांनी म्हटले. जनतेच्या मनात असणारे लोकप्रिय ठाकरे सरकार रात्रीच्या वेळेस गद्दारी करून पाडण्यात आले. सुरत, गुवाहाटी, गोवा मार्गे जाऊन महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान केला आहे. असा आरोप देखिल करण्यात आला. यावेळी “50 ओके, एकदम ओके” “महाराष्ट्र त्रस्त, गद्दार मस्त”  “गद्दार हटाव, महाराष्ट्र बचाओ” अशा प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या. आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा : 

The post धुळ्यात राष्ट्रवादीने केला खोके दिवस साजरा appeared first on पुढारी.