नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा
केंद्र सरकारच्या 16 सप्टेंबर, 2022 रोजीच्या अधिसूचनेनुसार 58 सेवा फेसलेस पद्धतीने नागरिकांना देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यापैकी 9 सेवा यापूर्वीच नागरिकांना फेसलेस पद्धतीने देण्यात आले आहेत. तर त्यात भर देत आणखी 4 सेवांची वाढ झाली असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर यांनी दिली आहे. चार फेसलेस सेवा नागरिकांच्या आधार क्रमांकाचा वापर करून देण्यात येणार असल्याने यापुढे नागरिकांना परिवहन कार्यालयामध्ये येण्याची आवश्यकता राहणार नसल्याने नागरिकांनी या सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन बिडकर यांनी केले आहे.
नव्याने भर देण्यात आलेल्या चार फेसलेस सेवा अशा…
अनुज्ञप्तीमध्ये मोबाईल नंबर अद्यावत करणे, अनुज्ञप्तीची माहिती मिळविणे (DL Extract), दुय्यम कंडक्टर अनुज्ञप्ती, कंडक्टर अनुज्ञप्तीचे नूतणीकरण या चार सेवांचा समावेश आहे.
हेही वाचा:
- Disha Patani video : दिशा नव्या मित्राला घेऊन कार्तिकच्या बर्थडे पार्टीला!
- हिंजवडी : गायरान जागेसाठी ग्रामस्थांच्या फेर्या, अतिक्रमणमुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून तयारी सुरू
- महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाबाबतचा दावा ताकदीने लढणार : पृथ्वीराज चव्हाण
The post नंदुरबार : परिवहन कार्यालयामार्फत आणखी चार फेसलेस सुविधा उपलब्ध appeared first on पुढारी.