नाशिकचा निलेश राणे राज्यस्तरीय द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित

nilesh rane www.pudhari.news
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
कोल्हापूर येथे घेण्यात आलेल्या श्री संत सावता माळी साहित्य संमेलनामध्ये येथील निलेश राणे याने क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याने त्याला राज्यस्तरीय द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
निलेशच्या या कामगिरीमुळे क्रीडा क्षेत्रात राज्यात व राष्ट्रीय स्तरावर ग्रामीण भागात क्रीडा क्षेत्राचा मोठ्या प्रमाणावर विकास झाला आहे. होतकरू खेळाडूंना मार्गदर्शन करून त्यांना अनेक स्तरावर खेळण्याची संधी उपलब्ध करून देत अनेक क्षेत्रात अग्रेसर राहून कार्यरत आहे. निलेश भारतीय क्रीडा विकास आणि पदोन्नती महासंघाचा राष्ट्रीय उपाध्यक्ष असून अनेक राज्यस्तरीय व राष्ट्रीय पुरस्काराने त्याचा गौरव करण्यात आलेला आलेला आहे. तसेच वर्ल्ड बुक रेकॉर्ड (लंडन) मध्ये देखील त्यांची नोंद झालेली आहे.

हेही वाचा:

The post नाशिकचा निलेश राणे राज्यस्तरीय द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित appeared first on पुढारी.