नाशिकची वाटचाल शैक्षणिक हबकडे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक हे भारतासह जगभरातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण घेण्याकरिता पसंतीचे ठिकाण होत असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. सल्लागार संस्था जेएलएल आणि क्रेडाई नाशिक मेट्रो यांच्या संयुक्त विद्यमाने केलेल्या ‘फाइनएस्ट एज्युकेशन हब ऑफ इंडिया’ या विषयावरील पाहणी अहवालात ही बाब समोर आली आहे.

नाशिक हे देशातील आणि जगभरातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण घेण्याकरिता पसंतीचे ठिकाण ठरत असल्याचे एका सर्वेक्षणात समोर आले आहे. जगप्रसिद्ध सल्लागार संस्था जेएलएल आणि क्रेडाई नाशिक मेट्रो द्वारे संयुक्तरीत्या केलेल्या ‘फाइनएस्ट एज्युकेशन हब ऑफ इंडिया’ या विषयावरील पाहणी अहवाल शेल्टरच्या उद्घाटन समारंभात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. नाशिकचे हवामान, मुबलक पाणी, भारतातील आघाडीच्या शहरांपेक्षा कमी प्रदूषण पातळी, येथील सुंदर नैसर्गिक लँडस्केप आणि परवडणारे राहणीमान यामुळे नाशिक हे भारतातील सर्वात राहण्यायोग्य शहरांपैकी एक झालेले आहे. या सर्वेक्षणाबाबत बोलताना क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष रवि महाजन म्हणाले की, एज्युकेशन हब म्हणून विकसित होण्यासाठी नाशिककडे योग्य घटक आहेत. एक उदयोन्मुख नॉलेज हब म्हणून शहरामध्ये प्रचंड क्षमता असताना, हबला चालना देण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी ज्ञानाचे पोषण करणारी इकोसिस्टम तयार करणे महत्त्वाचे ठरेल. जेएलएलचे प्रादेशिक व्यवस्थापकीय संचालक करणसिंग सोडी यांनी सांगितले की, 2019-20 मध्ये उच्च शिक्षणात एकूण 38.5 दशलक्ष विद्यार्थी असल्याचा अंदाज आहे. नवीन शैक्षणिक धोरणाच्या उद्दिष्टांप्रमाणे वर्ष 2035 पर्यंत उच्च शिक्षणामध्ये हीच नोंदणी संख्या दुप्पट होईल, असे लक्ष्य आहे.

रोजगारासाठी शिक्षणाचे महत्त्व
उच्च शिक्षण देशाच्या कर्मचार्‍यांची रोजगारक्षमता वाढविण्यात आणि राष्ट्राच्या आर्थिक विकासात थेट योगदान देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. भारत एक ज्ञान अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना, तरुण भारतीयांची वाढती संख्या उच्च शिक्षणाची आकांक्षा बाळगण्याची शक्यता आहे.

हेही वाचा:

The post नाशिकची वाटचाल शैक्षणिक हबकडे appeared first on पुढारी.