नाशिकच्या ध्रुव गणोरे यांची जर्मनीकरीता फुटबॉल प्रशिक्षणासाठी निवड 

भगूर www.pudhari.news
नाशिक (देवळाली कॅम्प) : पुढारी वृत्तसेवा
भगुरगावचे सुपुत्र युवा फुटबॉलपटू ध्रुव संदीप गणोरे यांची जर्मनी येथे फुटबॉल प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली असून त्यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे.
गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेल्या ‘महाराष्ट्र कप’ फुटबॉल स्पर्धेची अंतिम फेरी क्रीडा प्रबोधिनी येथे झाली. यात मोठ्या संख्येने स्पर्धक सहभागी झाले होते. अटीतटीच्या स्पर्धेत भगूर येथील ध्रुव संदीप गणोरे याने चपळपणे व जिद्दीने खेळ रंगवला. त्याची जर्मनी येथील फुटबॉल प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली. या निवडीमुळे ध्रुवचा मुंबई येथे क्रिडामंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रायोजक भुषण खोत, बरून दास, संदीप गणोरे उपस्थितीत होते. ध्रुवला वयाच्या पाचव्या वर्षांपासून फुटबॉलची आवड निर्माण झाली. भाऊ कबीर याची भक्कम साथ असल्याने ध्रुवने नाशिकरोड येथील अनबिटेबलस या क्लबकडून अनेक स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावली. गेल्या वर्षी जून-2022 मध्ये राज्यस्तरीय ट्रायल स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातून ध्रुवची निवड क्रिडाप्रबोधीनीसाठी झाली होती. तेव्हापासून तो प्रशिक्षण घेत आहे. मे-2023 महिन्यात ध्रुव जर्मनी येथे प्रशिक्षणासाठी रवाना होणार आहे. यासाठी त्याला आजोबा भगूर येथील कापड व्यावसायिक चंद्रकांत गणोरे, आजी तसेच वडील संदीप गणोरे व आई गायत्री गणोरे यांचे मार्गदर्शन लाभले.

हेही वाचा:

The post नाशिकच्या ध्रुव गणोरे यांची जर्मनीकरीता फुटबॉल प्रशिक्षणासाठी निवड  appeared first on पुढारी.