नाशिकमध्ये तरुण-तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

आत्महत्या, www.pudhari.news

निलगीरी बागेत युवकाची आत्महत्या…

औरंगाबाद रोडवरील निलगीरी बागेत राहणाऱ्या २० वर्षीय युवकाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. आकाश मोतीराम आंबेकर (२०) असे या युवकाचे नाव आहे. आकाश याने सोमवारी (दि. २०) सायंकाळी साडे सहाच्या सुमारास गळफास घेतल्याचे आढळून आले. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

म्हसरुळला तरुणीची आत्महत्या…

म्हसरुळ येथील किशोर सुर्यवंशी मार्ग परिसरातील ओंकार नगर भागात राहणाऱ्या पूनम बबन खांदवे (१८) या तरुणीने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. पुनम हिने सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास आत्महत्या केल्याचे समोर आले. याप्रकरणी म्हसरुळ पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

The post नाशिकमध्ये तरुण-तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या appeared first on पुढारी.