नाशिकमध्ये महाविद्यालयीन तरुणींत ‘फ्री स्टाईल’ हाणामारी; बघ्यांची गर्दी

नाशिक; पुढारी वृत्तसेवा : नशिक-पुणे महामार्गावरील बिटको कॉलेजसमोर दोन महाविद्यालयीन युवतींमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने याची जोरदार चर्चा सुरू आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, शुक्रवारी (दि. ३) सकाळी बिटको कॉलेजसमोर दोन महाविद्यालयीन युवतींमध्ये बाचाबाची झाली. याचे रूपांतर हाणामारीत झाले. काही क्षणातच घटनास्थळी बघ्यांची तुफान गर्दी झाली. अनेकांनी हाणामारी सोडवण्याचा प्रयत्नही केला, मात्र तरीही दोघी युवती ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. घटनास्थळी उपस्थितीत काही नागरिकांनी या हाणामारीचे व्हिडीओ केले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

पोलीस चौकी समोरच घडली घटना

बिटको कॉलेज लगतच पोलीस चौकी असून युवतींचा हा हाणामारीचा प्रकार पोलीस चौकी समोरच घडला. त्यामुळे आता गुन्हेगार तर सोडाच पण महाविद्यालयीन युवतींमध्ये सुद्धा पोलिसांचा धाक नसल्याची चर्चा सध्या जोरात आहे.

हेही वाचा : 

The post नाशिकमध्ये महाविद्यालयीन तरुणींत 'फ्री स्टाईल' हाणामारी; बघ्यांची गर्दी appeared first on पुढारी.