नाशिक : अंबडला एकाच रात्री दोन घरफोड्या; लाखोंचा ऐवज लंपास

चोरी www.pudhari.news
नाशिक (सिडको) : पुढारी वृतसेवा
अंबड परिसरातील दातीरनगर भागात एका रात्रीतून दोन घरे फोडून एक लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दातीरनगर परिसरातील साई माऊली अपार्टमेंट या ठिकाणी राहणारे मोतीराम दातीर यांच्या घरात चोरट्यांनी कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश करत सामानाची नासधूस केली. मात्र या ठिकाणी चोरट्यांचे हाती काहीच लागले नाही त्यानंतर चोरटंयानी मोर्चा वरच्या मजल्यावर राहणारे विनोद निवृत्ती माताडे यांच्या घराकडे वळवला. त्यांच्या बंद घराचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश करत कपाटात ठेवलेले सोने चांदीचे दागिनेसह रोख रक्कम असा एकूण एक लाख 59 हजार रुपयांचा मुद्देमाल घरफोडी करत चोरले. दरम्यान या इमारतीमध्ये पूर्वी देखील घरफोडीच्या घटना घडल्या असल्याचे रहिवाशांनी सांगितले आहे. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, चुंचाळे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजू पाचोरकर, सहाय्यक पोलीस  निरीक्षक वसंत खतेले आदींनी घटनास्थळाचा पंचनामा केला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात संशयीता विरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : अंबडला एकाच रात्री दोन घरफोड्या; लाखोंचा ऐवज लंपास appeared first on पुढारी.