नाशिक : पाथर्डीगाव चौफुलीवर दुचाकी घसरून युवक ठार

 अनिल अशोक दोंदे
नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा
पाथर्डी फाटा ते पाथर्डी गाव रस्त्यावर पेट्रोल पंपासमोर दुचाकी स्लीप होऊन दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना घडली आहे.
याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाणे येथे अपघाताची नोंद करण्यात आली आहे. पाथर्डीफाटा ते पाथर्डी गाव रस्त्यावर अनिल अशोक दोंदे (वय ३२ वर्ष रा. पाथर्डी गाव, दोंदे मळा) यांची दुचाकी घसरून अपघात झाला. उपचारासाठी त्यांना तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल केले असता नंतर पुढील उपचारासाठी आडगाव मेडीकल कॉलेज येथे दाखल केले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात चार बहिणी, दोन भाऊ, आई, मावशी असा परिवार आहे.  पाथर्डी गाव अमरधाम मध्ये अत्यंत शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी गावातील सर्व पक्षीय नागरीक, नातेवाईक, राजकिय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील म्यान्यवर उपास्थित होते.

हेही वाचा:

The post नाशिक : पाथर्डीगाव चौफुलीवर दुचाकी घसरून युवक ठार appeared first on पुढारी.