सिडको, पुढारी वृत्तसेवा : सातपूर अंबड लिंकरोडवर संजीवनगर भागात वादातून एकाने त्याच्याकडे असलेल्या बंदुकीतून हवेत गोळीबार केल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच तत्काळ पोलीस आयुक्त जयंत नाईक नवरे, पोलीस उपायुक्त विजय खरात, सहाय्यक आयुक्त सोहील शेख, अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख, सहाय्य्क निरीक्षक वसंत खतेले, उपनिरीक्षक उत्तम सोनवणे, संदीप पवार यांच्यासह अंबड पोलीस ठाण्याचे पथक व गुन्हे शाखा युनिट क्रमांक २ चे वरिष्ठ निरीक्षक आनंद वाघ व पथक घटनास्थळी पोहोचले असून या प्रकरणाबाबत तपास सुरु आहे. मात्र, ज्यांनी गोळीबार केला तो फरार असून पोलीस या प्रकरणी तपास करीत आहेत. दरम्यान संजीव नगर परिसरात पोलीस छावणीबीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
हेही वाचलंत का?
- PM Modi Himachal Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रुग्णवाहिकेसाठी भररस्त्यावर ताफा थांबवला! (VIDEO)
- Chhawla Rape Case : बलात्कार प्रकरणातील फाशी झालेल्या आरोपींची सर्वोच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
The post नाशिक : अंबड लिंक रोडवर गोळीबार; आरोपी फरार appeared first on पुढारी.