नाशिक : अग्निशमन दलातील शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी आज रॅली

अग्निशमन रॅली,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

अग्निशमन सेवा सप्ताहानिमित्त महानगरपालिकेतर्फे विविध उपक्रम राबविले जात आहेत. आतापर्यंत मॉल, शाळा, बहुमजली इमारत तसेच हॉटेलमध्ये मॉकड्रिल केले आहे. दरम्यान, गुरुवारी (दि.२०) अग्निशमन सेवा सप्ताहाचा रॅली काढून समारोप करण्यात येणार आहे. मुख्य अग्निशमन केंद्र शिंगाडा तलाव येथून ४.३० वाजता रॅली निघणार आहे. अग्निसुरक्षाबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी ही रॅली काढली जाणार आहे.

संकलित झालेला निधी शहीद जवानांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द केला जाणार आहे. शहरातील मेनरोडवरून ही रॅली निघणार आहे. मनपा अग्निशमन विभागातील कर्मचारी यात सहभागी होणार आहेत. याशिवाय एलएसजीडीचे प्रशिक्षणार्थी, महाराष्ट्र फायर सर्व्हिस अकादमीचे प्रशिक्षणार्थी, एमएनजीएल कंपनीचे प्रतिनिधी, अंबड एमआयडीसीमधील अग्निशमन केंद्रातील प्रतिनिधी आणि फायर सिक्युरिटीज असोसिएशन इंडिया या संस्थेचे प्रतिनिधी रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत. दरम्यान, मनपा सिडको अग्निशमन केंद्रातर्फे पाथर्डी फाट्याजवळील हॉटेल रेडिसन ब्लू येथे मॉकड्रिल आणि मार्गदर्शन करण्यात आले. तसेच आगीची घटना घडल्यास आपत्कालीन परिस्थितीमध्ये काय काय करावे? यासंदर्भात स्टेशन ऑफिसर आर. एम. बैरागी यांनी मार्गदर्शन केले.

बंटी पाटील, गरळ ओकाल, तर गाठ माझ्याशी आहे : शौमिका महाडिक

अग्निशमन दलाकडे असलेल्या उपकरण व साहित्याची माहिती सिडको अग्निशमन केंद्राचे केंद्रप्रमुख रवींद्र लाड आणि लीडिंग फायरमन मुकुंद सोनवणे यांनी दिली. लीडिंग फायरमन प्रमोद लहामगे, मोहन मधे, मोईन शेख, फायरमन कांतीलाल पवार, विजय नागपुरे आणि सात ट्रेनी फायरमन यांनी प्रात्यक्षिक दाखविले. वाहनचालक नंदकुमार व्यवहारे, शरद देटके यांनी बंबांची चाचणी करून दाखविली.

हेही वाचा : 

The post नाशिक : अग्निशमन दलातील शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी आज रॅली appeared first on पुढारी.