नाशिक : उच्चशिक्षित दिव्यांगांचे प्रमाण अधिक : कुलगुरू माहेश्वरी

नॅब पुरस्कार www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 21 प्रकारचे शारीरिक व्यंग असणार्‍या व्यक्तींसाठी दिव्यांग शब्दप्रयोग केला आहे. आज प्रत्येक क्षेत्रात दिव्यांग व्यक्तींनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मुळात दिव्यांग व्यक्तींना सहानुभूतीची नाही, तर आत्मविश्वास देण्याची गरज असते. भारताच्या तुलनेने विकसित देशांत दिव्यांग उच्चशिक्षित अधिक असल्याचे प्रतिपादन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. विजय लक्ष्मीनारायण माहेश्वरी यांनी केले.

नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड युनिट (नॅब) कडून राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभाप्रसंगी नाइस सभागृहात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. नॅबकडून दहावी, बारावी, पदवीधर, प्राध्यापक, दृष्टिबाधितांसाठी विशेष कार्य करणार्‍या संस्थांना यावेळी गौरविले. यंदाचे 25 वे रौप्यमहोत्सवी वर्ष होते. व्यासपीठावर नॅबचे अध्यक्ष रामेश्वर कलंत्री, उपाध्यक्ष सूर्यभान साळुंखे, मानद महासचिव गोपी मयूर, सहसचिव मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, डॉ. राजेंद्र कलाल, डॉ. प्रा. सिंधू काकडे, डॉ. अश्विनीकुमार भारद्वाज, डॉ. विजय पाईकवार, अशोक बंग उपस्थित होते. कुलगुरू माहेश्वरी म्हणाले, माणसाचा मेंदू अमूल्य ठेवा आहे, जो हार्ड डिस्कसारखा काम करतो. शिक्षण परिवर्तन घडून आणण्याचे व लढण्याचे बळ देते. अभिमान, अहंकार समजून घेताना अहंकार क्षणभंगूर तर अभिमान चिर:काल असल्याचे माहेश्वरी म्हणाले. स्नेहल सारंग यांनी सूत्रसंचालन केले.

यांचा झाला सत्कार
आदर्श विशेष शिक्षक पुरस्कार : परमानंद तिराणीक (चंद्रपूर), चंद्रकांत कुंभार (सोलापूर), दशरथ कदम (रत्नागिरी), भारत परेवाल (नाशिक).
आदर्श शैक्षणिक संस्था : नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड शाखा (कोल्हापूर), दि पूना स्कूल अँड होम फॉर दि ब्लाइंड ट्रस्ट, कोरेगाव पार्क (पुणे).
विशेष गौरव पुरस्कार : जाई खामकर (पुणे), सागर पाटील (मुंबई).
आदर्श प्राध्यापक पुरस्कार :
डॉ. अभिधा धुमटकर (मुंबई).
एसएससी : 23 विद्यार्थी, एचएससी : 42 विद्यार्थी, पदवीधर : 15 विद्यार्थी.

हेही वाचा:

The post नाशिक : उच्चशिक्षित दिव्यांगांचे प्रमाण अधिक : कुलगुरू माहेश्वरी appeared first on पुढारी.