नाशिक : कळवणला लाच‌खोर प्रकल्प अधिकारी जाळ्यात

भ्रष्टाचार

नाशिक (कळवण) : पुढारी वृत्तसेवा

येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील सहाय्य्यक प्रकल्प अधिकारी प्रताप वडजे यास १० हजरांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. रात्री चौकशी करून कळवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

कळवण आदिवासी प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या शासकीय आश्राम शाळेत रोजंदारीने सफाई कर्मचारी (चतुर्थश्रेणी) पदावर काम करणाऱ्या पदावर नियुक्ती करण्यासाठी सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रताप वडजे यांनी ३० हजारांची मागणी केली होती. सोमवारी (दि.२९) दुपारी तक्रारदाराकडून १० हजारांची लाच स्वीकारताना त्यास रंगेहात पकडयात आले. याबाबत चौकशी करून कळवण पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. दरम्यान कळवण आदीवासी विकास विभागातील भरष्ट्राचार या घटनेने पुन्हा उघडकीस आला आहे. कळवण आदिवासी विकास कार्यालयात होणारा भ्रष्ट्राचार रोखण्यासाठी अनेक वर्षांपासून सहाय्यक जिल्हाधिकारी दर्जाचा अधिकाऱ्यांची नेमणूक केली जात आहे. सहाय्यक जिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी नियुक्त असल्याने कोणीही येथे तक्रार करण्यास धजावत नाही कारण हे अधिकारी सर्वसामान्य नागरिकांना सहज भेटत नसल्याने त्यांना कार्यालयातील खालचे अधिकारी व कर्मचारी यांना भेटण्याशिवाय पर्याय नसल्याने सर्वच योजनांमध्ये भ्रष्ट्राचार बोकाळला आहे. आदिवासींची हेळसांड कधी थांबणार असा यक्ष प्रश्न आदिवासींना पडला आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : कळवणला लाच‌खोर प्रकल्प अधिकारी जाळ्यात appeared first on पुढारी.