नाशिक : गाण्याच्या माध्यमातून महावितरणकडून विजबील भरण्यासाठी समाज प्रबोधन

दिंडोरी www.pudhari.news

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा

‘आला वायरमन आला’ गाण्याच्या माध्यमातून महावितरणकडून समाज प्रबोधन करण्यात येत आहे. महावितरणचे कर्मचारी रवी बाबू गोडांबे यांनी गीत सादर केले आहे. या गाण्याचे चित्रीकरण झाले असून ते युट्युबला व इंटरनेटच्या वेबसाईटला बघायला मिळत आहे. यापूर्वी कोरोना काळात  देखील गीताच्या माध्यमातून “विज बिल भरा तुम्ही आता वीज बिल भरा आणि सहकार्य करा” “अहो दादा भरा की तुमचं विज बिल” अशा दोन गाण्यांच्या माध्यमातून ग्राहकांना वीज भरण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे.

चांदवड विभागातील व पिंपळगाव बसवंत येथील असिस्टंट लाईनमन म्हणून महावितरणमध्ये काम करणारे रवी बाबू गोडांबे यांच्या संकल्पनेतून गीत साकारले असून गीताचे लेखन गायन निर्मिती व दिग्दर्शक स्वतःच केले आहे. अल्पावधीतच गीताला व्हिडिओला युटयुबवर व फेसबुकवर राज्यभरातील वीज मंडळ व ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहे. या माध्यमातून समाज प्रबोधनाचा उद्देश सफल होत आहे. असे पिंपळगाव बसवंत महावितरण उपकार्यकारी अभियंता एकनाथ कापसे व सहाय्यक अभियंता नितीन पगारे, मंगेश नागरे, रामप्रसाद थोरात यांनी सांगितले आहे. रवी गोडांबे हे यांचे मूळ गाव चंद्रपूर जिल्ह्यातील असून ते लहानपणापासून गाण्यासह नाविन्य करण्याची आवड त्यांनी जोपासलेली आहे. वीज ग्राहकांना बिल भरण्यास प्रोत्साहीत करण्यासाठी गाण्याचा विचार त्यांच्या मनात डोकावला. तत्काळ त्यांनी गीताचे शब्द जुळवण्यास सुरुवात केली. त्यातूनच ,”विज बिल भरा तुम्ही आता वीज बिल भरा “हे गीत साकारले व परिसरामध्ये खूपच गाजले. ‘आला वायरमन आला वायरमन’ या लोकगीतासाठी पालखेड कक्षाचे ऑपरेटर योगेश पवार वरिष्ठ तंत्रज्ज्ञ रवी गोडांबे वि. सहाय्यक रेखा गावित या गीताला नृत्य दिग्दर्शक म्हणून सिद्धार्थ सोळसे, अनिकेत खरात, गायत्री बागुल प्रणिता, बागुल कोमल, शिरसाट शितल, बंदरे वैष्णवी, खरे प्रिया, खरे कोमल, खरे गोपाल, मोरे, मनोज टोपले, सागर कुयटे, सोनू नेटारे या कलाकारांनी नृत्य सादर करून वायरमन आला वायरमन आला हे गीत सादर केले.

 

The post नाशिक : गाण्याच्या माध्यमातून महावितरणकडून विजबील भरण्यासाठी समाज प्रबोधन appeared first on पुढारी.