नाशिक : गोदारक्षकांसह सुरक्षारक्षक केवळ नावालाच

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
येथील गोदाकाठ धार्मिक कार्यासाठी जगभरात प्रसिद्ध असल्याने या ठिकाणी भाविकांसह पर्यटकांची गर्दी होते. मात्र त्यांंना गोदाकाठच्या भुरट्या चोरांचा त्रास होत असून, सुरक्षारक्षक केवळ नावालाच असल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे.

गोदावरी स्वच्छतेसाठी आणि येणार्‍या भाविकांच्या सुरक्षिततेसाठी नाशिक महापालिकेने या ठिकाणी सुरक्षारक्षक नेमले आहेत. गोदावरीचे पावित्र्य राखण्याबरोबरच येणार्‍या भाविकांसह पर्यटकांना त्रास होणार नाही, नाशिकचे नाव खराब होणार नाही याची जबाबदारी त्यांच्याकडे दिलेली आहे. मात्र, त्याकडे पूर्णत: दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होतो आहे. गेल्या काही दिवसांपासून येथे भिकार्‍यांसह भुरट्या चोरांनी उच्छाद मांडला आहे. येणार्‍या भाविकांच्या अंगलट जात त्यांचा पिच्छा पुरवण्याचे काम त्यांच्याकडून होत असल्याने भाविक नाराजी व्यक्त करत आहेत. येथे भिकार्‍यांना फुकट खाद्यपदार्थांचे वाटप होत असल्याने या ठिकाणी मोठ्या संख्येने भिकारी दिसून येतात. त्यांच्यात होणार्‍या भांडणामुळे एकाचा खून झाल्याची घटनाही यापूर्वी घडली आहे. त्यामुळे येथील भिकार्‍यांंना निवारागृहात पाठविण्याची मागणी होत आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : गोदारक्षकांसह सुरक्षारक्षक केवळ नावालाच appeared first on पुढारी.