नाशिक : छत्रपती शिवाजी महाराज यांनी कल्याणकारी राज्य निर्माण केले – ॲड. नितीन ठाकरे

नितीन ठाकरे www.pudhari.news

नाशिक (देवळाली कॅम्प) : पुढारी वृत्तसेवा

छत्रपती शिवाजी महाराज यांनी अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत स्वराज्य निर्माण केले. संपूर्ण जगात ते आदर्शवत राजे होवून गेले. त्यांनी लोककल्याणकारी राज्य निमार्ण केले, असे प्रतिपादन मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी केले.

येथील श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालयात बुधवारी  (दि. २९) माजी विद्यार्थी संघाने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व सरस्वती मूर्ती भेट दिली. कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे बोलत होते. व्यासपीठावर मराठा विद्या प्रसारक समाजाचे नाशिक ग्रामीणचे संचालक रमेश आबा पिंगळे, महाविद्यालयाच्या विकास समितीचे अध्यक्ष कांतीभाई तेजुकाया, सेवक संचालक एस. के. शिंदे, प्राचार्य डॉ. एस.एस. काळे, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष खंडेराव मेढे, उपाध्यक्ष वैभव पाळदे, खजिनदार गजीराम मुठाळ, संग्राम करंजकर, शिवाजी हांडोरे, प्रशांत धिवंदे आदी होते. ॲड. ठाकरे यांनी माजी विद्यार्थी संघाने महाविद्यालयाला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा त्याचप्रमाणे सरस्वती मूर्ती भेट दिल्याबददल त्यांचे आभार मानत कौतुक केले. माजी विद्यार्थी संघातर्फे अध्यक्ष खंडेराव मेढे यांनी मनोगत व्यक्त केले. प्राचार्य डॉ. एस. एस. काळे यांनी एसव्हीकेटी महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी संघ सतत क्रियाशिल असतो. त्याचप्रमाणे माजी विद्यार्थी संघाचे उपाध्यक्ष वैभव पाळदे यांनी स्वखर्चातून छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा तर खजिनदार गजीराम मुठाळ यांनी स्वखर्चातुन सरस्वती मूर्ती भेट दिल्याबददल त्यांचे आभार मानले. डॉ. जयश्री जाधव यांनी सुत्रसंचालन केले.

हेही वाचा:

The post नाशिक : छत्रपती शिवाजी महाराज यांनी कल्याणकारी राज्य निर्माण केले - ॲड. नितीन ठाकरे appeared first on पुढारी.