नाशिक : जिल्ह्यातील ६३ कंत्राटी ग्रामसेवकांच्या वेतनात वाढ

ग्रामसेवक www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत कंत्राटी ग्रामसेवकांच्या वेतनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील ६३ कंत्राटी ग्रामसेवकांचा समावेश असून, त्यांना आजच्या निर्णयानुसार १६ हजार रुपये इतके मानधन मिळणार आहे. यामुळे जिल्ह्यातील कंत्राटी ग्रामसेवकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

मंत्रिमंडळाच्या मंग‌‌ळवारी (दि. १३) झालेल्या बैठकीत ग्रामविकास विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या कंत्राटी ग्रामसेवकांच्या वेतनवाढीबाबत चर्चा झाली. या चर्चेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कंत्राटी ग्रामसेवक यांना मिळणारे ६ हजार आणि प्रवासी भत्ता १५०० रुपये असे ७ हजार ५०० वेतनावरून १६ हजार इतके वेतन वाढविण्यात येणार असल्याची घोषणा केली. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख म्हणून ग्रामसेवक काम बघत असतो. यामध्ये कंत्राटी ग्रामसेवक दर्जाचेदेखील अधिकारी असतात. त्यांना नियमित करण्यापूर्वी रुपये ६ हजार इतके मानधन देण्यात येत होते. हे अतिशय कमी असल्याने त्यात वाढ करण्याच्या विचारात राज्य शासन होते. त्याला आज मूर्तरूप मिळाले असून, ही वाढ करण्यात आली आहे.

तालुका कंत्राटी ग्रामसेवक
नाशिक १
इगतपुरी २
त्र्यंबकेश्वर १
पेठ २
सुरगाणा २
दिंडोरी ३
देवळा २
बागलाण ४
मालेगाव १२
नांदगाव १
येवला ७
निफाड ६
सिन्नर १२
एकूण ६३

हेही वाचा:

The post नाशिक : जिल्ह्यातील ६३ कंत्राटी ग्रामसेवकांच्या वेतनात वाढ appeared first on पुढारी.