नाशिक : ठाकरे गटाचे महानगरप्रमुख बडगुजर यांना शिक्षा

sudhakar badgujar www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी सहायक पोलीस आयुक्तवर अरेरावी केल्याप्रकरणी शिवसेनेचे ठाकरे गट महानगरप्रमुख तथा माजी सभागृह नेते सुधाकर बडगुजर यांना एक वर्ष सक्तमजुरी आणि 5000 रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी बडगुजर यांनी तत्कालीन सहायक पोलीस आयुक्त हेमराजसिह राजपूत यांच्याशी अरेरावी केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. याप्रकरणी बडगुजर यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच  ज्ञानेश्वर वासुदेव बडगुजर, राकेश निंबा शिरसाठ या दोघांनाही बडगुजर यांच्याबरोबर शिक्षा सुनावण्यात आली आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : ठाकरे गटाचे महानगरप्रमुख बडगुजर यांना शिक्षा appeared first on पुढारी.