नाशिक : दहिवड येथे शेततळ्यात बुडून एकाचा मृत्यू

नाशिक, पुढारी वृत्तसेवा : दहिवड येथे शेततळ्यात आंघोळ करताना बुडून एकाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेबाबत देवळा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवार( दि.१५) रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास देवळा तालुक्यातील दहिवड येथील नंदू निंबाजी जाधव यांच्या शेतातील गट नंबर ४६८ मध्ये त्यांच्याकडे काम करीत असलेला शेतमजूर निंबा खंडू सोनवणे (४०) हा दुपारी आंघोळीसाठी शेततळ्यात गेला असता पोहताना दम लागून आल्याने पाण्यात बुडून मृत्युमुखी पावला.

शेततळ्यात भरपूर पाणी असल्याने सदर तरुणाचा मृतदेह शोधण्यासाठी स्थानिकांनी जवळपास ४ तास प्रयत्न करून ही मृतदेह सापडला नाही. शेवटी मालेगाव येथील अग्निशामन दलाच्या शकिल अहमद, रविंद्र शेजवळ, शुभम पाटील, झाकीर हाजी, जीवन महिरे यांना बोलवून दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर सदर इसमाचा मृतदेह सापडण्यात यश मिळाले. देवळा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन साठी पाठविण्यात आले.करण्यात येऊन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. अधिक तपास देवळा पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक विजय सोनवणे हे करीत आहे.

हेही वाचलंत का?

The post नाशिक : दहिवड येथे शेततळ्यात बुडून एकाचा मृत्यू appeared first on पुढारी.