नाशिक : दिंडोरी बाजार समितीत ‘परिवर्तन’; शेतकरी परिवर्तनला 11, तर शेतकरी उत्कर्ष पॅनलला ५ जागा

दिंडोरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक अटीतटीची होऊन संस्थापक अध्यक्ष गणपतराव पाटील, माजी आमदार रामदास चारोस्कर यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनलने बाजी मारत १८ पैकी ११ जागांवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करीत सत्ता स्थापन केली आहे.

विद्यमान सभापती दत्तात्रेय पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी उत्कर्ष पॅनलची निर्मिती झाली, तर बाजार समितीचे संस्थापक अध्यक्ष गणपतराव पाटील, माजी आमदार रामदास चारोस्कर, सहकार नेते सुरेश डोखळे, भाऊलाल तांबडे, शहाजी सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन पॅनलची निर्मिती झाली होती. त्यात परिवर्तनला ११ जागा, तर शेतकरी उत्कर्ष पॅनलला ५ जागांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीत व्यापारी गटाने तटस्थ भूमिका घेऊन कोणत्याही पॅनलकडून निवडणूक न लढवता अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता.

अ. क्र. मतदारसंघ निहाय विजयी उमेदवार 1. सहकारी संस्था (सर्वसाधारण) प्रशांत कड 342, गंगाधर निखाडे 341, नरेंद्र जाधव 328, पांडुरंग गडकरी 326, कैलास मवाळ 321, बाळासाहेब पाटील 315,  दत्तात्रेय पाटील 350 2.सहकारी संस्था (इतर मागास प्रवर्ग)
प्रवीण जाधव 378, 3. सहकारी संस्था (भटक्या जमाती) श्याम बोडके 338 4. सहकारी संस्था (महिला राखीव) विमल जाधव 345, अर्चना अपसुंदे 347, 5. ग्रामपंचायत (सर्वसाधारण) दत्तू भेरे 510, योगेश बर्डे 506, 6. ग्रामपंचायत (अनु. जाती जमाती) दत्ता शिंगाडे 532, 7. ग्रामपंचायत (आर्थिकदृष्ट्या दुर्बल) दत्तू राऊत 555 8. व्यापारी मतदारसंघ नंदलाल चोपडा 306, अमित चोरडिया 326 9. हमाल तोलारी सुधाकर जाधव 24

हेही वाचा :

The post नाशिक : दिंडोरी बाजार समितीत 'परिवर्तन'; शेतकरी परिवर्तनला 11, तर शेतकरी उत्कर्ष पॅनलला ५ जागा appeared first on पुढारी.