नाशिक : दिंडोरी बाजार समिती निवडणुकीत दोन पॅनल मध्ये लढत; १८ जागांसाठी ४२ उमेदवार रिंगणात

दिंडोरी; पुढारी वृत्तसेवा : कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी यंदा विक्रमी अर्ज दाखल झाल्यानंतर अर्ज माघारीचे मुदतीत एकूण 107 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असून 42 उमेदवार रिंगणात आहे. यंदा प्रथमच सर्व पक्षांमध्ये फूट पडत पक्षीय ऐवजी विचार धारेवर दोन गट आमने सामने आले असून विकासाच्या मुद्द्यावर सत्ताधारी शेतकरी उत्कर्ष पॅनल व विरोधी परिवर्तन पॅनल मध्ये सरळ लढत रंगणार आहे.

दिंडोरी बाजार समिती साठी एकूण 149 अर्ज दाखल झाले होते त्यापैकी संस्थापक चेअरमन गणपतराव पाटील, माजी जिप उपाध्यक्ष प्रकाश वडजे,शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष भाऊलाल तांबडे, काँग्रेसचे युवा नेते वसंत कावळे,तालुकाध्यक्ष प्रकाश पिंगळ यांचेसह 107 उमेदवारांनी माघार घेतली.राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान चेअरमन दत्तात्रेय पाटील यांनी मविप्र चे संचालक तथा शिवसेना नेते प्रवीण जाधव,विलास निरगुडे ,भाजपचे शिवाजी पिंगळ, शाम बोडके,काँग्रेसचे गुलाब जाधव आदींना सोबत घेत शेतकरी उत्कर्ष पॅनल केला असून बाजार समितीत केलेल्या विकासाच्या जोरावर मतदार पॅनल ला संधी देतील असा विश्वास व्यक्त केला आहे.यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख पांडुरंग गणोरे राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष भास्कर भगरे आदी उपस्थित होते

तर राष्ट्रवादीचे दिंडोरीचे माजी नगराध्यक्ष कैलास मवाळ,अविनाश जाधव,गंगाधर निखाडे, प्रशांत कड यांनी माजी आमदार रामदास चारोस्कर,शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे,सुनील पाटील सुरेश डोखळे, कादवा संचालक शहाजी सोमवंशी,प्रकाश शिंदे,भाजप चे नेते नरेंद्र जाधव या सर्वांना सोबत घेत परिवर्तनाचा नारा देत परिवर्तन पॅनल ची निर्मिती केली असून सत्ताधारी गटाने बाजार समिती मध्ये शेतकरी हिताचे काम केले नसल्याचा सांगत यंदा परिवर्तन होईल असा विश्वास व्यक्त केला आहे.तर काँग्रेसने सत्ताधारी गटाने अपेक्षित जागा न दिल्याने तटस्त राहण्याची भूमिका तालुकाध्यक्ष प्रकाश पिंगळ यांनी जाहीर करत अकरा उमेदवारांची माघार घेतली आहे. व्यापारी गटात एकूण चार उमेदवार नंदलाल चोपडा,मनीष बोरा,अमित चोरडिया,गोविंद संभेराव हे उमेदवार नशीब अजमावत आहेत तर इतर जागांसाठी दोन्ही पॅनल ने आपले उमेदवार जाहीर करत निशाणी साठी अर्ज केले आहे.

सत्ताधारी शेतकरी उत्कर्ष पॅनल उमेदवार

सहकारी संस्था प्रतिनिधी (सर्वसाधारण गट)

  • दत्तात्रय पाटील
  • चंद्रशेखर देशमुख
  • शिवाजी पिंगळ
  • अनिल देशमुख
  • रघुनाथ मोरे
  • विलास निरगुडे
  • प्रवीण संधान

इतर मागास प्रवर्ग गट

  • प्रवीण जाधव

भटक्या विमुक्त जाती जमाती गट

  • शाम बोडके

महिला राखीव गट

  • सत्यभामा हिरे
  • विमल जाधव

ग्रामपंचायत गट सर्वसाधारण

  • वसंत जाधव
  • नरेंद्र पेलमहाले

अनुसूचित जाती जमाती गट

  • पांडुरंग टोंगारे

आर्थिक दुर्बल गट

  • पंडित बागुल
  • हमाल मापारी गट
  • सुधाकर जाधव

परिवर्तन पॅनल उमेदवार

सहकारी संस्था प्रतिनिधी(सर्वसाधारण)

  • प्रशांत कड
  • कैलास मवाळ,
  • गंगाधर निखाडे,
  • नरेंद्र जाधव,
  • पांडुरंग गडकरी,
  • रतन बस्ते,
  • बाळासाहेब पाटील

इतर मागास प्रवर्ग गट

  • दशरथ उफाडे

भटक्या विमुक्त जाती जमाती गट

  • प्रवीण केदार

महिला राखीव

  • रचना जाधव
  • अर्चना अपसुंदे

ग्रामपंचायत गट

  • योगेश बर्डे
  • दत्तू भेरे

अनुसूचित जाती जमाती गट

  • दत्ता शिंगाडे

आर्थिक दुर्बल गट

  • दत्तू राऊत
  • हमाल मापारी गट
  • विजय गोतरणे

The post नाशिक : दिंडोरी बाजार समिती निवडणुकीत दोन पॅनल मध्ये लढत; १८ जागांसाठी ४२ उमेदवार रिंगणात appeared first on पुढारी.