नाशिक : देवळा-मालेगाव रस्त्यावर कांद्याचा ट्रक पलटी

देवळा; पुढारी वृत्तसेवा : सोमवार (दि.२४) सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान देवळा बाजार समितीमधून कांदे भरून मालेगावच्या दिशेने निघालेला ट्रक कर्ला नदीनजीक पलटी झाल्याची घटना घडली. सुदैवाने जवळपास कोणतेही वाहन नसल्याने मोठा अनर्थ टळला, मात्र चालक व क्लिनर जखमी झाले. त्यांना पुढील उपचारासाठी देवळा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, देवळा बाजार समितीमधून कांदे भरून मालेगावच्या दिशेने निघालेला ट्रक (एमएच१४ केए ५१२१) झालटे मळा व कर्ला नदी नजीक पलटी झाला. यामुळे रस्त्याच्या कडेला कांद्याच्या गोणी पडून रस्त्यावर कांदेच कांदे झाले. संबंधित कांदा व्यापाऱ्याचे ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. या ट्रकवरील भूषण वलटे (करंजगाव ता.निफाड) व दशरथ वडवलकर (रा.बोरवळ) हे दोघे जखमी झाले.

The post नाशिक : देवळा-मालेगाव रस्त्यावर कांद्याचा ट्रक पलटी appeared first on पुढारी.