नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
सिन्नर पोलिस ठाण्याच्या पथकाने 2 लाख 55 हजार रुपये किमतीच्या 7 मोटारसायकली, 4 मोबाइल फोन, 1 लॅपटॉप, 1 फ्रीज, 2 टेबल जप्त करून दोघा संशयित आरोपींना अटक केली आहे. तसेच एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले.
सिन्नर परिसरातील मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघड करण्याबाबत नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी आदेश केले होते. त्याप्रमाणे अपर पोलिस अधीक्षक माधुरी कांगणे, उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ तांबे यांनी मार्गदर्शन करून गुन्हे उघड करण्याबाबत सूचना दिल्या. प्रवीण मच्छिंद्र कोकाटे (27, रा. कानडीमळा, सिन्नर) यांनी त्यांची होंडा कंपनीची शाईन मोटारसायकल चोरी झाल्याबाबत फिर्याद दिली होती. त्यानुसार 10 नोव्हेंबर रोजी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस उपनिरीक्षक हरिश्चंद्र गोसावी, पोलिस नाईक चेतन मोरे, निवृत्ती गिते, राजेश काकड, पोलिस अंमलदार गौरव सानप यांनी गोपनीय माहिती काढून संशयित आरोपी प्रशांत मोगल काशिद (23, रा. वेळुंजे, ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक), सूरज सोमनाथ धोत्रे (20, मुळ रा. देवी रोड, सिन्नर, ह. मु. मराठी शाळेजवळ, कोटमगाव, ता. जि. नाशिक) व एक विधीसंघर्षित बालक यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक तपास केला असता त्यांनी सिन्नर शहरातून मोटारसायकली, शंकरनगर येथे एक जबरी चोरी करून मोबाइल, अहमदनगर येथून मोटारसायकल चोरल्याची व नाशिक शहर हद्दीतील उपनगर व नाशिकरोड येथे घरफोड्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडील 2 लाख 55 हजार रुपये किमतीच्या 7 मोटारसायकल, 4 मोबाइल फोन, 1 लॅपटॉप, 1 फ्रिज, 2 टेबल असा मुद्देमाल हस्तगत करून 6 गुन्हे उघडकीस आणले आहेत.
जप्त केलेला मुद्देमाल….
25 हजाराची होंडा कंपनीची शाईन मोटारसायकल (एमएच 15 ईएल 5238), 25 हजारांची हीरो होंडाची स्प्लेंडर मोटारसायकल (एमएच 15 एक्यु 5425), 15 हजारांची हीरो कंपनीची पॅशन मोटारसायकल (एमएच 15 ईवाय 2252), 25 हजारांची हीरो कंपनीची एचएफ डिलक्स मोटारसायकल (एमएच 16 बीएस 1120),25 हजारांची बजाजची डिस्कव्हर मोटारसायकल (एमएच 15 बीटी 1376), 7 हजार रुपयांचा ओपो कंपनीचा मोबाइल, 20 हजार रुपये किमतीची बजाज कंपनीची प्लॅटिना मोटारसायकल, 20 हजारांची महिंद्रा कंपनीची स्कूटर (एमएच 15 सीएल 4819).
हेही वाचा:
- Kumbh Mela 2027 : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ४ हजार १२७ कोटींची गरज
- सांगलीतले ‘ते’ सांबर अखेर वनविभागाकडून रेस्क्यू
- संसद हिवाळी अधिवेशन : आजच्या घडीला विश्वाच्या भारताकडून अपेक्षा वाढल्या; पंतप्रधान नरेंद्र मोदी
The post नाशिक : दोन संशयितांना अटक करत सात मोटारसायकली जप्त appeared first on पुढारी.