नाशिक : पंधरवड्यापासून होत आहे बिबट्याचे दर्शन; ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण

बिबट्या

नाशिक (निफाड): पुढारी वृत्तसेवा
निफाड तालुक्यातील शिवडी, सोनेवाडी, उगांव परिसरात गेल्या पंधरवड्यापासुन बिबट्याचे वारंवार दर्शन होत असल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण आहे. मात्र, वनविभागाकडून कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नसल्याने नागरिकांच्या जीवावर बेतत आहे.

शिवडी परिसरातील सोनेवाडी रस्त्याजवळील कातकाडे वस्तीवर रविवारी दि. ७ रोजी मध्यरात्री बिबट्याने घरासमोरील ओट्यावर बसलेल्या श्वानाला ओढून नेत ठार केले. यावेळी नागरिकांनी बिबट्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न करताच बिबट्याने नागरिकांवरही  धावण्याचा प्रयत्न केला. येथील परिसर हा अत्यंत रहदारीचा असून‌ या‌ भागातुून ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांचे ये-जा सुरु असते. त्यामुळे मुलांना शाळेत पाठवतांना पालकांना चिंता भेडसावत आहे. बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी त्वरीत पिंजरा लावण्याची मागणी स्थानिक अरुण कातकाडे, संजय शिंदे, संतोष कातकाडे, मनोज खापरे, राजेंद्र क्षीरसागर, लाला कातकाडे, बाळासाहेब क्षीरसागर, कैलास सांगळे, संजय खापरे, आप्पासाहेब कातकाडे आदींसह नागरिकांनी केली आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : पंधरवड्यापासून होत आहे बिबट्याचे दर्शन; ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण appeared first on पुढारी.