नाशिक : पंधरा दिवसांनंतर पुन्हा त्याच ब्लॅकस्पॉटवर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू

nashik accident,www.pudhari.news

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

शिरवाडे वणी फाटा येथे बसच्या धडकेने 15 दिवसांपूर्वी शिरवडे वणी येथील एकाच कुटुंबातील तीन तरुणांना जागीच जीव गमवावा लागला. पुन्हा त्याच ब्लॅकस्पॉटवर भीषण अपघातात दोन कारची एकमेकांना धडक होऊन एका तीनवर्षीय मुलासह 35 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अन्य पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.

याबाबत पाेलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निफाड तालुक्यातील शिरवाडे वणी फाटा येथे रविवारी (दि. 9) रात्री ११.४५ च्या सुमारास कैलास शंकर बऱ्हाटे (रा. भुसावळ) हे इर्टिगा कार (एमएच ४६, डब्ल्यू २३५०) ने मुंबई-आग्रा महामार्गावर नाशिककडून चांदवडकडे भरधाव चालले होते. त्याच वेळी वडनेर भैरवकडे जाणाऱ्या ओम्नी कार (एमएच १५, डीसी २८८९) ला त्यांच्या कारची जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात देवांश सुमित पगार (3) तसेच भूषण विठ्ठल धोटे यांचा मृत्यू झाला. ओम्नी कारमधील मोहन पगार, मीना पगार, सुमित पगार तसेच इर्टिगा कारमधील स्वप्निल चौधरी, मयूर बऱ्हाटे हे जखमी झाले. पिंपळगाव पाेलिस ठाण्यात दोन्ही कारचालकांविरुद्ध गुन्हारण्यात आला आहे. या अपघाताची माहिती कळताच पिंपळगाव बसवंत येथील पावले ॲम्ब्युलन्सचे प्रथमेश पावले यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले.

हेही वाचा : 

The post नाशिक : पंधरा दिवसांनंतर पुन्हा त्याच ब्लॅकस्पॉटवर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू appeared first on पुढारी.