नाशिक : पोलीस कलेक्टरांची मोक्याच्या जागेसाठी फिल्डिंग; पोलिस अधिका-यांवर राजकीय दबाव ?

कलेक्टर www.pudhari.news
नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
पोलिस ठाण्यातून शहरातील इतर विभागात बदली झालेल्या काही पोलिस कलेक्टर महाशयांनी आपल्याला मोक्याच्या जागेवर नियुक्ती मिळावी, यासाठी जोरदार फिल्डिंग लावल्याची चर्चा पोलिस वतृळात केली जाते आहे. राजकीय वरदहस्त असलेले हे कलेक्टर वरिष्ट अधिका-यांवर दबावतंत्राचा वापर करुन आपल्याला हव्या त्या ठिकाणी नियुक्ती मिळावी, यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करीत असल्याचे बोलले जात आहे. अशा दबावतंत्राचा वापर करणा-या कलेक्टरांची पीटीसी विभागात बदली करुन त्यांना आयुक्तांनी चांगली अददल घडवावी, असा सूर प्रमाणिकपणे कर्तव्य बजाविणा-या पोलिस अधिकारी अन् कर्मचा-यांमध्ये उमटतांना दिसतो आहे.
शहरातील अनेक नगरांपैकी एक असणा-या एका उपनगराच्या कलेक्टरच्या राजकीय वरदहस्ताची चर्चा पोलिस वतुर्ळात सर्वदूर आहे. या कलेक्टर महाशयांनी आजवर राजकीय हितसंबधाचा वापर करुन पोलिस अधिका-यांवर कायम दबाव ठेवत हेतू साध्य केला आहे. काही दिवसांपूर्वी बदली होऊनही हे कलेक्टर महाशय आपल्या जुन्याच कामावर लक्ष केंद्रीत करीत असल्याची चर्चा सर्वदूर आहे. बदली झालेल्या ठिकाणचा चार्ज घेण्यासाठी हे महाशय टाळाटाळ करीत आहे. त्याचप्रमाणे आपली नियुक्ती गुन्हे शाखा एक किंवा दोन किंवा मध्यवर्ती गुन्हे शाखा येथे करावी, यासाठी हे कलेक्टर महाशय प्रयत्नशील असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता संबधित अधिकारी वर्ग काय निर्णय घेतात, याकडे कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी अन कर्मचा-यांचे लक्ष लागून आहे. पोलीस कलेक्टरांच्या दबावाला पडून त्यांना हव्या त्या ठिकाणी नियुक्ती दिली तर पोलीस वर्तुळात वेगळा संदेश जाऊ शकतो. तर आपली बदली होईल त्या ठिकाणी आदेशाचे पालन करुन रूजू होणाऱ्या प्रामाणिक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये यामुळे निश्चितपणे नाराजीचा सूर निर्माण होऊ शकतो.

हेही वाचा:

The post नाशिक : पोलीस कलेक्टरांची मोक्याच्या जागेसाठी फिल्डिंग; पोलिस अधिका-यांवर राजकीय दबाव ? appeared first on पुढारी.