नाशिक : बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र प्रकरणी तपास ठप्प

Pimpri chinchwad municpal corporation chief health inspectors caste certificate is bogus

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पोलिसांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्यांसाठी बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला असून, त्यात दोघांना अटकही झाली. मात्र, त्यानंतर या प्रकरणात कोणालाही अटक झालेली नसून कागदोपत्री तपास सुरू असून, अटक टाळण्यासाठी वरिष्ठ डॉक्टर न्यायालयात धाव घेत आहेत, तर ज्या पोलिसांनी ही प्रमाणपत्रे सादर केली, ते चौकशीस सामोरे येत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे गुन्हा दाखल होऊन महिना उलटूनही या प्रकरणात ठोस कारवाई किंवा पुरावे समोर आले नसल्याचे बोलले जात आहे.

आंतरजिल्हा बदल्यांसाठी पोलिसांनी बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केले. हा प्रकार तपासणीत लक्षात आल्यानंतर ग्रामीण पोलिसांनी नाशिक तालुका पोलिस ठाण्यात जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, खासगी डॉक्टरांवर गुन्हा दाखल केला. या प्रकरणी ग्रामीण पोलिस दलातील वरिष्ठ लिपीक व जिल्हा रुग्णालयातील लिफ्टमन यांना अटक केली होती, तर अटक टाळण्यासाठी तत्कालीन अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ. निखिल सैंदाणे व डॉ. किशोर श्रीवास यांनी अटकपूर्व जामीनअर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने दोघांचा अर्ज फेटाळला. दरम्यान, डॉ. सैंदाणे यांनी उच्च न्यायालयात अर्ज केल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. तर, संशयित किशोर पगारे याच्या अटकपूर्व अर्जावर मंगळवारी (दि. 27) सुनावणी होणार आहे. त्याचप्रमाणे या प्रकरणातील खासगी डॉ. स्वप्निल सैंदाणे यांचाही माग काढण्यात पोलिस यशस्वी झालेले नाहीत. डॉ. स्वप्निल नॉट रिचेबल आहेत. बदल्यांसाठी बनावट प्रमाणपत्र सादर करणार्‍या अर्जदार पोलिसांना नोटिसा देऊनही ते चौकशीसाठी हजर झालेले नाहीत. त्यामुळे या प्रकरणातील तपासच पुढे सरकत नसल्याचे दिसते.

हेही वाचा:

The post नाशिक : बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र प्रकरणी तपास ठप्प appeared first on पुढारी.