नाशिक : बाजार समितीच्या निवडणुकीने नांदगावमध्ये राजकीय वातावरण तापले

कृषी उत्पन्न बाजार समिती नांदगाव www.pudhari.news

नाशिक (नांदगाव) : पुढारी वृत्तसेवा
बाजार समितीच्या संचालक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. 18 संचालकांच्या जागेसाठी 40 उमदेवार निवडणूक मैदानात उतरले असून, शुक्रवारी चिन्हवाटप झाल्याने निवडणुकीसाठी पॅनलदेखील तयार झाले आहे. निवडणूक प्रचार आता जोर धरताना दिसत आहे.

आमदार सुहास कांदे

ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे

या निवडणुकीत आमदार सुहास कांदे, ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज पॅनल निवडणूक लढवत असून, या पॅनलला पतंग निशाणी मिळाली आहे. तर, माजी आमदार पंकज भुजबळ, अनिल आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली परिवर्तन पॅनल निवडणूक लढवित असून, या पॅनलला छत्री हे चिन्ह मिळाले आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून आजी-माजी आमदारांची राजकीय कसोटी लागणार आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत कांदे आणि कवडे यांच्या मार्गदर्शनातून शिवसेनेने आपले वर्चस्व राखत बाजार समितीवर आपली विजयी पताका लावली होती. आता परत आपली सत्ता कायम ठेवण्याचा आमदार कांदे, बापूसाहेब कवडे यांचा प्रयत्न असला तरी माजी आमदार पंकज भुजबळ, अनिल आहेर यांचा आपल्याकडे सत्ता खेचण्याचा प्रयत्न असेल. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांसह राजकीय पक्षाचे पदाधिकारी तालुक्यातील गावागावांत जाऊन वाड्या – वस्त्या पिंजून काढत मतदारांपर्यंत पोहोचत मतदानाचा प्रचार करताना दिसून येत आहे.

माजी आमदार पंकज भुजबळ

अन्य उमदेवार
ग्रा.पं. सर्वसाधारण गट : भाऊसाहेब सोनवणे, मापारी गट : नीलेश इप्पर
ग्रामपंचायत गट : संतोष राठोड. व्यापारी गट : गोकुळ राठोड, संजय सानप
एकूण मतदार संख्या
ग्रामपंचायत : 624 विविध कार्यकारी सोसायटी : 555
व्यापारी : 356. हमाल मापारी : 112

माजी आमदार अनिल आहेर

परिवर्तन पॅनल उमेदवार
सर्वसाधारण सोसायटी गट : दिलीप नंद, शिवाजी वाघ, धोंडिराम काळे, दर्शन आहेर, हरेश्वर सुर्वे, समाधान बोगीर, अमित नहार. महिला गट : चंद्रभागा वाबळे, बेबीताई पगार. सोसायटी इ. मा. प्रवर्ग : अमित बोरसे. विजाभज : अ‍ॅड. सुरेश आव्हाड. ग्रामपंचायत गट : दीपक खैरनार,
उदय पवार, अशोक जाधव. आर्थिक दुर्बल : विजय चव्हाण.
व्यापारी गट : मुकुंद खैरनार.

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी विकास पॅनल ग्रामपंचायत गट : अनिल वाघ, अर्जुन पाटील, दीपक मोरे, अनिल सोनवणे, सोसायटी महिला गट : मंगल काकळीज, अलका कवडे, विजाभज गट : पोपट सानप, ओबीसी : विलास आहेर. सोसायटी सर्वसाधारण गट : एकनाथ सदगीर, कैलास पाटील, समाधान पाटील, विजय इप्पर, साहेबराव पगार, जीवन गरुड, सतीश बोरसे. व्यापारी गट : यज्ञेश कलंत्री, अमोल नावंदर. हमाल मापारी : भास्कर कासार

The post नाशिक : बाजार समितीच्या निवडणुकीने नांदगावमध्ये राजकीय वातावरण तापले appeared first on पुढारी.