नाशिक : भगुर गावात सोनवणे-शिंदे गटात तुंबळ हाणामारी

देवळाली कॅम्प, पुढारी वृत्तसेवा : भगुर येथील कदम वाड्यात संरक्षण भिंत तोडल्याच्या कारणावरून सोनवणे व शिंदे या दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. यात चाकू, लोखंडी पाईप, दगडविटा चा सरस वापर केला असुन दोन्ही गटातील एक एक जण गंभीर जखमी झाले आहेत त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तर रात्री उशिरापर्यंत पोलिस स्टेशनमध्ये दोन्ही गटावर गुन्हे दाखल करण्याचे काम चालू होते.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी वार दि ६ रोजी दुपारच्या सुमारास तक्रारदार संतोष बाळु सोनवणे यांचा भाऊ राजेंद्र बाळु सोनवणे हे कदम वाड्यात राहातात त्यांच्या समोर राहाणारे अनिकेत बाळु शिंदे बाळु पुंडलिक शिंदे शाम पुंडलिक शिंदे यांनी संगनमताने राजेंद्र सोनवणे यांची संरक्षण भिंत तोडत संतोष सोनवणे यांच्या डोक्यावर लोखंडी पाईप दगडविटा ने मारहाणीत हात ही फॅक्चर झाला आहे. त्यास त्वरित कॅन्टाेन्मेन्ट बोर्ड हाॅस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

तर दुसऱ्या गटाचे तक्रारदार शाम पुंडलिक शिंदे यांनी सांगितले मी नाशिक येथे राहात असुन माझ्या मालकीच्या जागेचा वादविवाद चालू आहे याठिकाणी माझा भाऊ बाळु पुडलिक शिदे यास बांधकाम करावयाचे असल्याने आमच्या मालकी जागेतील भिंतीचे वाँलकंपाऊन पाडत असताना विरोधक राजेंद्र बाळु सोनवणे.संतोष बाळु सोनवणे यांनी चाकु व लोखंडी गजाने बाळु शिंदे यांना गंभीर मारहाण करून जखमी केले त्यामुळे त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे याचवेळी ज्योती राजेंद्र चव्हाण यांनी शिवीगाळ केली याप्रकरणी देकँम्प पोलिसांनी शिंदे गटाचे शाम शिंदे सोनवणे गटाचे राजेंद्र सोनवणे यांना अटक करून गंभीर गुन्हा दाखल करून न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाची पोलिस कोठडी मिळाली तर दोन्ही गटातील चार आरोपी यांच्यावर कारवाई चालू आहे व पो नि कुंदन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश गिते करत आहेत.

हेही वाचंलत का?

The post नाशिक : भगुर गावात सोनवणे-शिंदे गटात तुंबळ हाणामारी appeared first on पुढारी.