नाशिक : भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या परप्रांतीय युवकाचा खून

Murder

दिंडोरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

रुमसमोर लघवी केल्याचा जाब विचारत असताना दोघांमधे झालेले भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या युवकाचा चाकुने भोसकुन खून करण्यात आल्याने खळबळ उडाली असून संशयिता विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिंडोरी पोलिसांनी संशयितास अटक केली आहे. रविवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास ही थरारक घटना घडली. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोईराकुमार रामप्रवेश रिकीयासन (29) यास राजकुमार बैजनाथ बियार याने रुमसमोर लघवी करतो या कारणावरुन कुरापत काढुन डाव्या हाताच्या मनगटावर वार करुन जखमी केले. हे भांडण टोकाला जावू नये म्हणून योगेश विश्वेश्वर रीकीयासन याने मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला. त्याच रागात राजकुमार याने योगेशचा निघृण खून केला. वाद सोडविण्यासाठी गेलेल्या योगेशला हकनाक आपला जीव गमवावा लागला.

घटनेची माहीती मिळताच कळवण उपविभागीय अधिकारी पुष्कराज सुर्यवंशी, पोलिस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे, पोऊनि पी. बी कावळे, अमोल पवार व ढोकरे यांनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान संशयीत राजकुमार यास अटक करण्यात आली असून खुनात वापरलेला चाकु जप्त करण्यात आल्याची माहीती मिळाली आहे.

The post नाशिक : भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या परप्रांतीय युवकाचा खून appeared first on पुढारी.