नाशिक : भाजपाच्या चित्रा वाघ यांची पिडीत महिलेच्या घरी भेट देत केले कुटुंबाचे सांत्वन

chitra wagh www.pudhari.news

नाशिक (ईगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा
नराधमाने येथील महिलेवर अत्याचार करून खून केला. अशा हरामखोराला फाशीची शिक्षाच झालीच पाहिजे यासाठी न्यायालयापर्यंत पाठपुरावा करू, असे आश्वासन भाजपाच्या चित्रा वाघ यांनी खंबाळे येथील पिडीत महिलेच्या कुटुंबाला व ग्रामस्थांना दिले आहे.

खंबाळे हद्दीत दि. २१ मे रोजी सकाळी १० च्या सुमारास विश्रामगृहाच्या बाजूला असलेल्या दगड खाणीमध्ये कपडे धुण्यासाठी महिला गेली असता अज्ञातांनी मद्यधुंद अवस्थेत सामुहीक बलात्कार करत अत्याचार करुन तोंडावर व डोक्यात दगड घालुन निघृणपणे हत्या केल्याची घटना घडली होती. चित्रा वाघ यांनी पिडीत कुटुंबांच्या घरी जाऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच पक्षाच्या वतीने ५० हजार रुपयांचा धनादेश दिला. त्या म्हणाल्या की, एखादी वाईट घटना घडत असेल तर लोक मदत न करता व्हीडीओ काढण्यात मग्न असतात. मात्र या घटनेवेळी खंबाळेच्या ग्रामस्थांनी या नराधमाला पकडून पोलीसांच्या ताब्यात दिले. त्यामुळे खंबाळे ग्रामस्थांचे कौतुक झाले पाहिजे.

खंबाळे गावात ग्रामपंचायतीने दारूबंदीचा ठराव करूनही सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांनी अंमलबजावणी न केल्यामुळे विवाहीतेला जीव गमवावा लागल्याचा आरोप करीत घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी व सहायक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांना निलंबित करण्यात यावे. तसेच घोटी पोलीस ठाण्यात सक्षम अधिकारीची नेमणूक करण्यात यावी. त्याचप्रमाणे महिला रोजंदारीवर मोलमजुरी करून कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालवत होती. पिडीत महिलेच्या मुलांना शासकीय नोकरीत सामावून घेण्यात यावे अशा मागणीचे निवेदन याप्रसंगी भाजपाच्या पदाधिकारी व ग्रामस्थांनी चित्रा वाघ यांना दिले. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष सुनिल बच्छाव खंबाळेचे उपसरपंच दिलीप चौधरी, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब कडभाने, माजी तालुकाध्यक्ष अण्णासाहेब डोंगरे, ज्येष्ठनेते किरण फलटणकर, भाजप युवा मोर्चाचे जिल्हा चिटणीस निखील हांडोरे, तालुकाध्यक्ष रवि गव्हाणे, दिलीप देवांग, पिंटू जोशी, किशोर चव्हाण, चेतन जोशी, रमेश परदेशी, पालसिंग बंगड, तानाजी जाधव, कैलास कस्तुरे, अनिल चौधरी, भाऊसाहेब धोंगडे, जगन भगत, सुनिल मुनोत, बाळु साखला, अशोक पिचा, मिलन श्रीश्रीमाळ, सज्जन नाठे, रमेश गव्हाणे, तसेच भाजपा महिला आघाडीच्या वैशाली आडके, स्वाती भामरे, रोहीणी नायडु, पल्लवी शिंदे आदी उपस्थित होते.

हेही वाचा:

The post नाशिक : भाजपाच्या चित्रा वाघ यांची पिडीत महिलेच्या घरी भेट देत केले कुटुंबाचे सांत्वन appeared first on पुढारी.