नाशिक : मनमाडमध्ये उध्दव सेनेला मोठा धक्का! दोन निष्ठावंतांचा शिंदे गटात प्रवेश

मनमाड; पुढारी वृत्तसेवा : नांदगाव विधानसभा मतदार संघातील उध्दव सेनेचे निष्ठावंत माजी आमदार राजेंद्र देशमुख आणि अल्ताफ खान यांनी आपल्या समर्थकांसह शिंदे गटात प्रवेश केला. बुधवारी (दि.५) रात्री मुंबई येथे वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश त्यांनी केला.

त्यांच्या या प्रवेशानंतर मनमाड शहर उध्दव सेनेला मोठा धक्का बसला असून आपण विकासाच्या मुद्यावर आमदार सुहास कांदे यांच्या नेतृत्वाखाली यापुढे नांदगाव मतदारसंघात शिवसेनेचे प्रामाणिकपणे काम करू, अशी ग्वाही माजी आमदार देशमुख यांनी दिली. मुख्यमंत्री ना. शिंदे यांनी त्यांचे शिवसेनेत स्वागत करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी पालकमंत्री दादा भुसे , आमदार सुहास कांदे ,फरहान खान, मयूर बोरसे यांच्या सह कार्यरते उपस्थित होते , देशमुख आणि खान यांच्या प्रेवेशाने आमदार सुहास कांदे यांची ताकद वाढली असून आगामी निवडणुकांमध्ये याचा फायदा शिंदे गटाला होणार आहे

The post नाशिक : मनमाडमध्ये उध्दव सेनेला मोठा धक्का! दोन निष्ठावंतांचा शिंदे गटात प्रवेश appeared first on पुढारी.