नाशिक : महापालिकेतर्फे स्वच्छ भारत अभियान स्पर्धा

नाशिक महानगरपालिका www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या आदेशान्वये घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड यांच्या दालनात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व स्वच्छ सर्वेक्षण 2022-23 अंतर्गत मनपातर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी नृत्य व पथनाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

पर्यावरण संवर्धन व आपल्या सभोवतालच्या परिसराच्या स्वच्छतेप्रति नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी यादृष्टीने नाशिक महापालिकेतर्फे शहरात महाकवी कालिदास कलामंदिर येथे शनिवारी (दि.27) नृत्य व पथनाट्य स्पर्धा आयोजित केली आहे. या माध्यमातून शहरातील विद्यार्थ्यांसाठी एक व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. स्पर्धेचे विषय पर्यावरण प्रदूषण आणि प्रदूषण रोखण्याचे उपाय, प्लास्टिक वापराचे दुष्परिणाम, स्वच्छतेप्रति नागरिकांचे कर्तव्य, नदीपात्राचे होणारे प्रदूषण आणि संवर्धनाचे उपाय असे सामाजिक विषय आहेत. नागरिकांमध्ये जनजागृती होण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. स्पर्धेत सहभाग नोंदविलेल्या शालेय विद्यार्थ्यांमधून उत्कृष्ट प्रथम तीन विजेत्या विद्यालयांना पारितोषिके देऊन गौरवण्यात येणार आहे. स्पर्धेत बहुतांश विद्यालयांनी सहभाग घेतला आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : महापालिकेतर्फे स्वच्छ भारत अभियान स्पर्धा appeared first on पुढारी.