नाशिक : माजी नगरसेवकास नसलेल्या मोबाईल टॉवरचा फटका

नाशिक महानगरपालिका www.pudhari.news

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

मनपा बहुतेक वेळा अवाजवी घरपट्टी पाणीपट्टी तसेच इतर कर बीलाच्या थकबाकीबाबत तक्रार करत असतात. आता तर चक्क मनपात सतत दहा वर्ष नगरसेवक असणारे चुंचाळे येथे राहणारे माजी नगरसेवक भागवत आरोटे यांना बंगल्यावर मोबाईल टॉवर नसताना देखील महानगरपालिकेने थकबाकी कर म्हणून रुपये तेरा लाख पंचवीस हजार रुपयाचे बिल दिले आहे. नगरसेवकांना अशा प्रकारे बिल पाठवतात तर सर्व सामान्य नागरिकांची काय स्थिती असेल अशी चर्चा परिसरात सुरु आहे.

महानगरपालिकेने भागवत आरोटे यांना थकबाकी बिल पाठवून येत्या पाच दिवसात थकबाकीची रक्कम भरली नाही तर मालमत्ता जप्त करण्याचा इशारा बिलादवारे दिला आहे. मालमत्ताकराचे थकबाकी भरणेबाबत सन 2022-23 या आर्थिक वर्षातील मालमत्ता कराचे मागणीचे देयक बजविण्यात आले आहे. त्यानुसार देयकामध्ये नमुद केलेली मालमत्ताकर व सरकारी कर इत्यादी विहीत मुदतीत भरणे अनिवार्य असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच पत्र मिळालेपासून पाच दिवसाच्या आत नाशिक महानगरपालिकेच्या नागरी सुविधा केंद्रांमध्ये अथवा संकेतस्थळ (www.nmctax.in) वर भरणा करण्याचे सुचित करण्यात आले. दिलेल्या मुदतीत थकबाकी रकमेचा भरणा न केल्यास पुढील कार्यवाही करण्याचे जप्तीचे अधिपत्र बजावून मालमत्ता जप्त करण्याबाबत व थकबाकीबद्दल दावा दाखल करण्याबाबतची नोंद घेण्याबाबत पत्राव्दारे सांगण्यात आले. तर एकूण रक्कम  रुपये १३२५८०८ चे बिल पाठविण्यात आले आहे.

टॉवर बील www.pudhari.news

चुंचाळे शिवारातील रामकृष्णनगर येथे वास्तव्यास आहे. माझ्या बंगल्यावर मोबाईल टॉवर उभारलेले नाही. तरी मनपाने मोबाईल टॉवरचे तेरा लाख पंचवीस हजार रुपयाचे थकबाकी बिल पाठविले आहे. त्या विरोधात मनपा कार्यालयात तक्रार दाखल केली आहे. – भागवत आरोटे, माजी नगरसेवक.

हेही वाचा:

The post नाशिक : माजी नगरसेवकास नसलेल्या मोबाईल टॉवरचा फटका appeared first on पुढारी.