नाशिक : ‘माता सुरक्षित, तर घर सुरक्षित’ मोहीम थंडावली

aai www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नवरात्रोत्सवाच्या मुहूर्तावर सुरू केलेल्या “माता सुरक्षित, तर घर सुरक्षित’ अभियानास सुरुवातीला महिलांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला होता. मात्र, जसजशी मुदत संपत आली, तसतसा या अभियानाला महिलांचा प्रतिसाद कमी कमी होत गेला. या अभियानासाठी जिल्ह्यात सुमारे १८ लाख २९ हजार महिलांची नोंद आहे. गेल्या महिनाभरात अभियानांतर्गत पाच लाख ७० हजार महिलांची आरोग्य तपासणी झाली आहे. मात्र, आता अखेरच्या दोन दिवसांत जिल्हा परिषद प्रशासनासमोर १२ लाख ५९ हजार महिलांची तपासणी करण्याचे मोठे आव्हान आहे. हे अशक्य असल्याने या अभियानाची मुदतवाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत जिल्हास्तरावर “माता सुरक्षित, तर घर सुरक्षित’ अभियानाला नवरात्रोत्सवापासून सुरुवात करण्यात आली आहे. या अंतर्गत नाशिक ग्रामीण भागासह नाशिक महापालिका आणि मालेगाव महापालिका क्षेत्रातील महिला, युवतींची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. रक्तदाब, रक्तशर्करा, रक्ताचे प्रमाण अशा विविध चाचण्या करताना आरोग्यविषयक तक्रारी असलेल्या महिलांना पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात येत आहे.

एकूण महिलांपैकी…

उच्च रक्तदाब : १२ हजार १९९ महिला

गरोदर महिला उच्च रक्तदाब : ३ हजार ६७४ महिला

मधुमेह : २ हजार १८० महिला

तीव्र रक्तक्षय : १ हजार ५९६ महिला

हायपोथायरॉईड : ८०७ महिला

हायपरथायरॉईड : १ हजार ३६३ महिला

३० वर्षांवरील महिला : २ लाख ८४ हजार ९८७

उच्च रक्तदाब : ३ हजार ९६६ महिला

मधुमेह : २ हजार ७७७ महिला

हृदयरोग : ७९४

नेत्रविकार तपासणी : ७ हजार ९९२ महिला

शस्त्रक्रियेसाठी संदर्भित : २ हजार २९१ महिला

नाक-कान-घसा तपासणी : १३ हजार २६६ महिला

हेही वाचा:

The post नाशिक : ‘माता सुरक्षित, तर घर सुरक्षित’ मोहीम थंडावली appeared first on पुढारी.