नाशिक : प्रेमाचे आमिष दाखवून वेळोवेळी अत्याचार करणार्‍यास सात वर्षे सक्तमजुरी

न्यायालय www.pudhari.news

नाशिक : प्रेमाचे आमिष दाखवून वेळोवेळी अत्याचार करणार्‍या युवकास न्यायालयाने सात वर्षे सक्तमजुरी व 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. अनिल खंडेराव गायकवाड (21, रा. वरखेडा, ता. दिंडोरी) असे या आरोपीचे नाव आहे. अल्पवयीन मुलीस अनिल याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केले. याबाबत कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही अनिलने पीडितेस दिली होती. दरम्यान, पीडिता गर्भवती झाली. सहा महिन्यांचा गर्भ असताना पीडितेने स्त्री अर्भकास जन्म दिला, मात्र ते जन्मत: मृत होते. यामुळे अनिल विरोधात गुन्हा दाखल होता.

हेही वाचा :

The post नाशिक : प्रेमाचे आमिष दाखवून वेळोवेळी अत्याचार करणार्‍यास सात वर्षे सक्तमजुरी appeared first on पुढारी.