नाशिक : यशवंतराव चव्हाण सेंटर (Yashwantrao Chavan Centre) आणि परिसर आशा यांच्याकडून राज्यातील मुलांच्या मानसिक आरोग्य आणि वर्तणुकीशी संबंधित समस्यांच्या निराकरणासाठी विनामूल्य हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये वर्तणुकीच्या समस्या, शैक्षणिक समस्या, एकाग्रता, नातेसंबंधांतील अडचणी, अस्वस्थता, भीती, वैफल्य, क्रोध, स्क्रीनचे व्यसन, अमली पदार्थ, शिक्षणातील अडथळे, करियरविषयक मार्गदर्शन करण्यात येईल. मुलांच्या वर्तणुकीशी संबंधित सर्व प्रकारच्या मानसिक समस्या या हेल्पलाइनद्वारे सोडवण्यात येणार आहेत. संबंधितांची माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाणार आहे. हेल्पलाइन 18005322244, 9594466461 (Free helpline) या क्रमांकावर सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत उपलब्ध असल्याचे खासदार सुप्रिया सुळे व नाशिक सेंटरचे अध्यक्ष अॅड. नितीन ठाकरे यांनी सांगितले.
हेही वाचा:
- शेतीसाठी पाणी उपशावर मर्यादा; पिण्याच्या पाण्यासाठी सरकारचा निर्णय
- रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची प्रकृती चिंताजनक
- पुण्याबाहेरील बांधवांसाठी सहेरीची व्यवस्था
The post नाशिक : मानसिक स्वास्थ्यासाठी विनामूल्य हेल्पलाइन appeared first on पुढारी.