नाशिक : माहिती भरण्यास हलगर्जी, चार प्राथमिक आरोग्य केंद्रांना नोटीस

नोटीस, notice

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आलेले कार्यक्रम प्राथमिक आरोग्य केंद्रांकडून गांभीर्याने घेतले जात नसल्याच्या तक्रारी वारंवार येत आहेत. नुकतेच एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत पी आणि एल हे ऑनलाइन माहिती भरणे प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राला बंधनकारक केले आहे. मात्र, जिल्ह्यातील चार प्राथमिक आरोग्य केंद्रांनी ही माहिती भरली नसल्याने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहेते यांनी गंभीर दखल घेत संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना नोटीस बजावल्या आहेत.

एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत जिल्ह्यात रोग किती आहेत, काही नावीन्यता आहे का, तसेच ग्रामीण भागातील परिस्थिती समजून घेण्यासाठी दैनंदिन आढावा घेतला जातो. सरकारने प्रणाली सोपी व्हावी यासाठी गुगल फॉर्मच्या पद्धतीचा ऑनलाइन फॉर्म तयार करून दिलेला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी फक्त त्यात माहिती भरून अपलोड करणे अपेक्षित असते. तेसुद्धा या प्राथमिक आरोग्य केंद्रांनी केले नसल्याने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नेहेते यांनी दिंडोरीमधील पांडाणे, त्र्यंबकेश्वरमधील अंजनेरी, ठाणापाडा आणि कळवणमधील मोकभणगी या प्राथमिक आरोग्य केंद्रांना नोटिसा काढल्या आहेत. त्यामुळे इतर वैद्यकीय अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

हेही वाचा : 

The post नाशिक : माहिती भरण्यास हलगर्जी, चार प्राथमिक आरोग्य केंद्रांना नोटीस appeared first on पुढारी.