नाशिक : मैदान चिखलमय असला तरी युगपुरुषाच्या नाटक प्रयोगासाठी हजारो प्रेक्षक

OZAR www.pudhari.news

ओझर : पुढारी वृत्तसेवा
क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले जयंती उत्सव समितीच्या वतीने सायंकाळी यात्रा मैदानावर महात्मा जोतिराव फुले व सावित्रीमाई फुले यांच्या जीवनावर आधारित प्रबोधनात्मक नाटकाला पाऊसही रोखू शकले नाही. पाऊस थांबताच हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या प्रेक्षकांच्या समोर या बहारदार नाटकाचा प्रयोग सादर झाला. या नाटकाचे लेखन सप्तर्षी माळी यांनी केले, तर ज्येष्ठ नाट्य कलावंत श्याम विसपुते यांनी दिग्दर्शक व महात्मा फुले यांची भूमिका साकारली. या नाटकात तीस स्थानिक कलाकारांनी भूमिका साकारली. यात्रा मैदानावरील कार्यक्रमास माजी आमदार अनिल कदम, ओमकोचे चेअरमन राजेंद्र शिंदे, माजी सरपंच हेमंत जाधव, प्रदीप अहिरे, दीपक शिरसाठ, प्रकाश महाले, उत्सव समितीचे अध्यक्ष राजेंद्र भडके आदी उपस्थित होते.

हेही वाचा:

The post नाशिक : मैदान चिखलमय असला तरी युगपुरुषाच्या नाटक प्रयोगासाठी हजारो प्रेक्षक appeared first on पुढारी.