नाशिक : म्हेळुस्केत शेतकऱ्याची गळफास घेत आत्महत्या

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील म्हेळुस्के येथील शेतकरी विनायक दिनकर गांगुर्डे (वय 42) यांनी घरातील छताला गळफास लावत आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

म्हेळुस्के शिवारातील गट नं.११७ या आपल्या शेतात विनायक गांगुर्डे वास्तव्यास होते. पत्नी आपल्या मुलांसह माहेरी गेल्याने विनायक घरी एकटेच होते. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास छताला साडीच्या सहाय्याने गळफास घेत त्यांनी आपली जीवनयात्रा संपविली. सकाळी आठच्या सुमारास विनायक यांची आई त्यांना उठविण्यासाठी गेली असता हा प्रकार लक्षात आला. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नसून दिंडोरीच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.

हेही वाचा:

The post नाशिक : म्हेळुस्केत शेतकऱ्याची गळफास घेत आत्महत्या appeared first on पुढारी.