नाशिक : युनिटी अमन फाउंडेशनतर्फे दररोज पाचशे सेहरी किटचे वाटप

अमन www.pudhari.news

जुने नाशिक : पुढारी वृत्तसेवा

रमजान महिन्यास प्रारंभ झाल्याने या महिन्यात गरजूंपर्यंत पहाटे रोजाकरिता करण्यात येणारी सेहरीसाठी लागणारे खाद्यपदार्थ जसे दूध, नान इत्यादी पोहोचविण्याचे काम जुने नाशिकमधील युनिटी अमन फाउंडेशनने हाती घेतले आहे. मागील अनेक वर्षांपासून फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष साजिद मुल्तानी हे कार्य करीत असून, वर्षानुवर्षे त्यांच्या कार्याला व्यापक स्वरूप प्राप्त होत आहे.

फाउंडेशनतर्फे दररोज सुमारे पाचशे गरजूंपर्यंत सेहरी किट पोहोचविण्यात येत आहे. यामध्ये जुने नाशिकमधील चौक मंडई, बागवानपुरा, कथडा, मुल्तानपुरा, बडी दर्गा शरीफ, काजीपुरा, आदमशाह, जोगवाडा, पिंजारघाट, नाईकवडीपुरा आदी भागांसह आजादनगर, भारतनगर, पंचशीलनगर, मोहम्मद अली रोड व वडाळा गावात फाउंडेशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते सेहरी किट गरजूंच्या घरापर्यंत पोहोचवित असल्याची माहिती मुलतानी यांनी दिली. दररोज सायंकाळी छोटा हत्ती टेम्पोच्या सहाय्याने थेट गरजूंच्या घरांपर्यंत सेहरी किटची बॅग पोहोचविण्यासाठी स्वतः फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष साजिद मुलतानी, बाबा कोकणी, शौकत सय्यद, मुस्तकीम घोलू, जमील शेख, अफसर अन्सारी, नजर कुरेशी, शिफान शेख, इब्राहिम मुलतानी, फजल शेख, फिरोज मन्सुरी आदी परिश्रम घेत आहेत.

हेही वाचा:

The post नाशिक : युनिटी अमन फाउंडेशनतर्फे दररोज पाचशे सेहरी किटचे वाटप appeared first on पुढारी.